digital products downloads

मी बायकोची हत्या करून आलोय!: पतीची पोलिस ठाण्यात कबुली; चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून हत्या, आरोपीला अटक – Mumbai News

मी बायकोची हत्या करून आलोय!:  पतीची पोलिस ठाण्यात कबुली; चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून हत्या, आरोपीला अटक – Mumbai News



कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या पत्नीची हत्या करून आरोपी पती पोलिस ठाण्यात पोहोचला. मी माझ्या बायकोची हत्या करून आलो असल्याची कबुली देखील त्याने दिली. विशाल भुतकर असे आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एक व्यक्ती त्याच्या भावाला घेऊन आला. त्याने पोलिसांना म्हटले की, माझा भाऊ काय सांगतो ते तुम्ही ऐका. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकरची चौकशी केली असता त्यांनाही धक्का बसला. विशाल भुतकरने सांगितले की, माझा माझ्या पत्नीशी वाद झाला होता. त्यानंतर मी कल्याण येथे गेलो. उंबर्डे परिसरात ती राहत होती. तिथे तिच्या घरी जाऊन मी तिचा गळा आवळून खून केला. ही कबुली ऐकून पोलिसही काही वेळासाठी हैराण झाले. विशाल भुतकरने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी चौकशी केली. तसेच समोर आलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी नाशिक पोलिसांनी तातडीने कल्याणमधील खडकपाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर खडकपाडा पोलिसांचे पथक विशालने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले असता तिथल्या घरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेची ओळख अर्चना भुतकर अशी पटवण्यात आली. चारित्र्यावर संशय अन् कौटुंबिक वाद या संदर्भातील अधिकची माहिती अशी की, विशाल आणि अर्चना यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. दोघांना दोन मुले देखील आहेत. त्यापैकी एक मूल विशालकडे तर दुसरे अर्चनाच्या आईकडे राहत असल्याची माहिती आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत विशालने अर्चनाचा गळा आवळून खून केला. आता पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा केला जात असून विशालला ताब्यात घेतले आहे. अर्चनाचा पती खूप दिवसांनी आल्याने गोडधोड जेवणाचा बेत होता दरम्यान, अर्चना ही स्वभावाने प्रेमळ असल्याचे तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले आहे. अर्चनाचा पती खूप दिवसांनी घरी आल्याने गोडधोड जेवणाचा बेत आखला गेला होता. जेवण झाल्यावर विशालसोबत असलेला त्याचा मुलगा भावाकडे सोडून याला आणि त्याच रात्री विशाल पुन्हा अर्चनाकडे गेला. त्यानंतर नेमके असे काय घडले की ज्यामुळे विशालने अर्चनाचा गळा आवळून हत्या केली. या संदर्भात आता खडकपाडा पोलिस तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp