digital products downloads

गणित चुकल्याने शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण: देवडी कला शाळेतील घटनेप्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनकडून गुन्हा दाखल – Nagpur News

गणित चुकल्याने शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मारहाण:  देवडी कला शाळेतील घटनेप्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनकडून गुन्हा दाखल – Nagpur News



गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून शिक्षकाने एका चिमुरडीला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील देवडी कला येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनने (1098) तत्परता दाखवत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनोहर वाडीभस्मे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चाइल्ड हेल्पलाइनच्या मीनाक्षी धडाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2026 रोजी देवडी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात गणिताचा तास सुरू होता. यावेळी एका विद्यार्थिनीने प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने संतापलेल्या शिक्षकाने तिला मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाइल्ड हेल्पलाईनच्या चमूने पीडित मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली. शिक्षकांनी आम्हाला शाळेत बोलावून एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ही बाब बाहेर सांगितल्यास मुलीला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली, असे मुलीच्या वडीलांनी चाइल्ड हेल्पलाईनच्या टिमला सांगितले. संबंधित शिक्षकाने पालकांवर दबाव टाकल्याचे मुलीच्या वडीलांनी सांगितले. वाडीभस्मे यांनी मुलीला मारहाण करून प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर धडाडे यांनी वेलतूर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच पालकांना धमकी दिल्याची बाब चौकशीत समोर आली. ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, चाइल्ड हेल्पलाईन पर्यवेक्षक अनिकेत भिवगडे आणि केस वर्कर मीनाक्षी धडाडे यांनी ही कारवाई पूर्ण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp