digital products downloads

लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामाचा रथोत्सव उत्साहात: 25 टन भंडाऱ्याची उधळण; अश्वाचे नृत्य मिरवणूकीचे आकर्षण – Kolhapur News

लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामाचा रथोत्सव उत्साहात:  25 टन भंडाऱ्याची उधळण; अश्वाचे नृत्य मिरवणूकीचे आकर्षण – Kolhapur News



भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण, पारंपारिक वाद्याचा गजर, आश्वांचे नृत्य आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ चा जयघोष करत भक्त भंडाऱ्यात अक्षरशः सोनेरी झालेला परिसर अशा उत्साही वातावरणात श्रीक्षेत्र आदमापुर तालुका भुदरगड येथे सद्गुरु बाळूमामा यांच्या रथोत्सव मिरवणूकीने भंडारा उत्सव सुरू झाला. निढोरी ते आदमापूर हा राज्य मार्ग भंडाऱ्याच्या उधळणीमुळे सोनेरी झाला होता. बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची विधीवत पूजा करण्यात आली. रथाची मिरवणूक तब्बल पाच तास चालली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर तालुका भुदरगड येथे सद्गुरु बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेस आज प्रारंभ झाला. भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांचे दुध महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे. राज्य आणि परराज्यातील अनेक भागात राहत असलेल्या बाळू मामांनी जतन केलेली बकऱ्या १९ ठिकाणी बग्गी (दीड ते दोन हजार बकऱ्यांचा कळप) च्या रूपात असतात. प्रथेप्रमाणे भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व कळपातील दुधाचे कलश निढोरीत एकत्र येतात. या दुधाने भरलेल्या कलशाचे पूजन करून स्वागत केले जाते. आदमापूरातून बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीत आगमण झाले. यावेळी बाळूमामाच्या रथावर जेसीबी मधून २५ टन भंडाऱ्याची उधळण केली. द्वादशी दिवशी सकाळी मानाच्या घागरीतून बाळूमामां च्या समाधीला दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादा मध्ये वापरले जाणार आहे. कर्नाटक ,औरनाळ,देवगड ,मिरज, मुंबई,गोवा, पंढरपूर व अन्य ठिकाणाहून मधून आलेले भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली. रथामध्ये १३८ किलो चांदीची बाळूमामांची मूर्ती धनगर बांधवांनी एक कोटी रुपये खर्च करून मंदीरास प्रदान केलेल्या रथामध्ये १३८ किलो वजनाची बाळुमामांची चांदीची मुर्ती विराजमान होती. या रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बाळूमामाच्या रथाच्या मिरवणुकीवर तसेच बाळूमामाच्या मंदिराच्या कळसावर, भक्तनिवास च्या समोर व राधानगरी निपाणी मार्गावर असणाऱ्या रथावर हेलिकॉप्टर मधून पुष्पष्टी करण्यात आली. भाविकांनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp