
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर येथील विठ्ठल मंदिरात दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी सप्ताहाचे हे ४२ वे वर्ष असून, ह.भ.प. शिवाजी महाराज मानकर यांच्यासह अनेक महाराजांनी कीर्तन-प्रवचन केले. यामुळे संपूर्ण गावात आनंदी आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. या सप्ताहाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये आध्यात्मिक भाव, राष्ट्रीयता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हा आहे. या शिबिरामुळे समाजाला मोठी उपयोगिता मिळते. सप्ताहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लहान मुलांना हरिपाठाचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यात गावातील अनेक मुला-मुलींचा सहभाग असतो. यावर्षीच्या प्रवचनात ह.भ.प. मुकेश महाराज आखरे, ह.भ.प. विष्णू महाराज अढावु, ह.भ.प. शिवाजी महाराज झामरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाघ, ह.भ.प. रामभाऊ महाराज उन्हाळे, ह.भ.प. प्रशांत महाराज ताकोते आणि ह.भ.प. विष्णू महाराज गावंडे यांनी कीर्तनाची सेवा दिली. त्याचबरोबर, सोपान महाराज शेलार, सतीश महाराज कुळकर्णी, विष्णू महाराज गावंडे, विशाल महाराज मालगे, गौरव महाराज देठे, ऋत्वीक गुल्हाने, महेश चव्हाण, तन्मय गुल्हाने आणि सोहम जाधव यांनी गायन व वादनाची सेवा दिली. सप्ताहादरम्यान महाराजांच्या भोजनाची व्यवस्था दररोज एका घरी केली जाते. यामध्ये सुधाकरराव जाधव, जनार्दन चव्हाण, मुरलीधर ढगे, रविंद्र भागवत, गोपाळराव सरोदे, किसनराव जुंजारे, प्रभाकर कोळसेकर, प्रमोद दाते, बाळु जाधव, चंद्रशेखर भागवत, प्रमोद चाफले, राजेंद्र कोकाटे, प्रकाशराव तिखीले, बंडू जाधव, विनायकराव तिखीले, ज्ञानेश्वरराव गायकवाड, कुमार न्याहाल, रामेश्वर ताठे, गणेश खवड आणि सुधाकरराव तिखीले यांनी सहभाग घेतला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



