digital products downloads

पुणे उपमहापौर वाडेकर पदाच्या सन्मानावरून नाराज: महापौर कार्यालयाकडून दुर्लक्ष, भाजपवर अप्रत्यक्ष टीका – Pune News

पुणे उपमहापौर वाडेकर पदाच्या सन्मानावरून नाराज:  महापौर कार्यालयाकडून दुर्लक्ष, भाजपवर अप्रत्यक्ष टीका – Pune News



पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदाला योग्य सन्मान मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मोठेपणा दाखवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला उपमहापौरपद दिले, मात्र प्रत्यक्षात त्या पदाचा मान राखला जात नसल्याचे वाडेकर यांनी सांगितले. वाडेकर यांच्या मते, अनेक अधिकृत बैठका आणि कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासाठी योग्य बसण्याची व्यवस्था केली जात नाही. काही वेळा त्यांना निमंत्रणही दिले जात नाही. शहरात आयोजित ‘महापौर चषक क्रीडा स्पर्धा’सारख्या कार्यक्रमांमध्येही उपमहापौरपद जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. औंध-बोपोडी परिसरात झालेल्या एका स्पर्धेतही त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी या पदापर्यंत मोठा संघर्ष करून आलो आहे आणि पुढेही संघर्ष करत राहणार,” असे सांगत वाडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी उपमहापौर पदाला योग्य सन्मान दिला जात होता, मात्र आता त्या परंपरेचा विसर पडल्याचे त्यांनी नमूद केले. महापौर कार्यालयाकडून वारंवार केवळ समजूत काढली जाते, पण प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भाजप आणि आरपीआयमधील अंतर्गत तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp