
एमआयडीसी चिकलठाणापरिसरातील शहानगर, मसनतपूरयेथे पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना उभारून एमडी ड्रग्ज तयारकरण्याचा कट एएनटीएफनेउधळला. सोमवारी १६ रोजी धडक कारवाई झाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. ६५ ग्रॅम एमडीसहविविध रसायने, असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त साहित्यावरून तब्बल २ किलोएमडी तयार करण्याचा त्यांचा डाव असल्याचे उघड झाले. रोशन रवींद्र कदम (३२), मयूर दीपक जाधव (२३), दोघेही रा.कोपरी, ठाणे पूर्व, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना २३ मार्चपर्यंत पोलिसकोठडी सुनावली. ही माहिती उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी मंगळवारी दिली. पोलिस निरीक्षकगीता बागवडे यांना मसनतपूर येथीलगल्ली क्रमांक ५ मध्ये जावेद शेखयांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतउभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्येबाहेरगावाहून आलेले दोघेजणएमडी तयार करत असल्याचीमाहिती मिळाली होती. दुपारीसाडेतीनच्या सुमारास पथकाने छापाटाकला. दोघेही डिस्टिलेशनप्रक्रियेद्वारे ड्रग्ज तयार करतानाआढळले. घटनास्थळावरून ६५ग्रॅम एमडी, राऊंड बॉटम फ्लास्क,कंडेन्सर, मिक्सर मशीन, प्लास्टिकड्रम व कॅन, लेबल नसलेल्यारसायनांच्या १२ बाटल्या, पावडरस्वरूपातील तीन बॉक्स, तीनमोबाइल फोन, इतर साहित्य जप्तकेले. चक्क केमिकल लॅबचा उभारला शेडमध्ये सेटअप छाप्यावेळी उभारलेली व्यवस्थापाहून पोलिसही चक्रावले.बाष्पीभवनासाठी चुलीवर ठेवलेलीभांडी, काचेचे कंडेन्सर, मिक्सरड्रिल मशीन, रसायनांचे ड्रम असाकेमिकल लॅबचा सेटअप होता. हेड्रग्ज बाजारात पोहोचले असते, तरशहरातील अनेक तरुणांचे आयुष्यधोक्यात आले असते. रॅकेटचेआणखी धागेदोरे शोधण्यासाठीएएनटीएफकडून तपास सुरू आहे.ही कारवाई विशेष पोलिसमहानिरीक्षक शारदा राऊत, पोलिसअधीक्षक अजित टिके,उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यामार्गदर्शनाखाली निरीक्षक गीताबागवडे, एपीआय विजय जगदाळे,दीपाली पाटील या पथकाने केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



