digital products downloads

उबाठा’ गट म्हणजे काँग्रेसचे अंतर्वस्त्र: महिला अत्याचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, गुन्हेगारांना ‘देवाभाऊ’ सोडणार नाहीत- नवनाथ बन – Mumbai News

उबाठा’ गट म्हणजे काँग्रेसचे अंतर्वस्त्र:  महिला अत्याचारावर बोलण्याचा राऊतांना अधिकार नाही, गुन्हेगारांना ‘देवाभाऊ’ सोडणार नाहीत- नवनाथ बन – Mumbai News



उद्धव ठाकरेंचे सरकार असताना स्वत:च्या पक्षात काय सुरू आहे हे संजय राऊत यांना समजले नाही, 40 आमदार सोडून गेले ते समजले नाही, आणि दिल्लीमध्ये काही तरी खदखदतंय म्हणता. जे काही होते ते उबाठामध्ये सुरू आहे, ते होतच राहणार असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आमच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता. त्यावेळी राऊत काहीच बोलले नाही. तेव्हा समान न्याय कुठे गेला होता. नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत. एखाद्या आई-बहिनीवर किंवा मुलीवर अत्याचार झाल्यावर तात्काळ त्यांची दखल घेतली जाते. राऊत तुम्ही महिला अत्याचाराबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. पाटकर नावाच्या बहिनीबद्दल तुम्ही काय काय बोलला होतात हे पाटकर फाईल्समध्ये जनतेने पाहिले आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू नका. अत्याचार करणाऱ्याला देवाभाऊंचे सरकार सोडणार नाही. देवाभाऊ हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात. उबाठा गट काँग्रेसचा “अंतर्वस्त्र” नवनाथ बन म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपला संपवणार अशी भूमिका घेतली होती. आता त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे हे आपण बघतो आहोत. कोण कुणाचे अंगवस्त्र आहे आणि कोण कुणाचे अंतर्वस्त्र आहे याचा हे विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. राऊतांचा पक्ष हा राहुल गांधीचा अंतर्वस्त्र म्हणून काम करतोय हे महाराष्ट्राने पाहिले आहे. राऊत आणि ठाकरेंनी राज्याचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. राऊत तुमचे माकड झाले नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमचे स्वत:चे माकड झाले आहे त्याकडे तुम्ही पाहिले पाहिजे.सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नादी लागत तुम्ही स्वत:चे माकड करुण घेतले आहे. तुम्हाला कुणाला मांजर म्हणायचा अधिकार नाही. माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर काय हाल होतात हे उबाठाकडे पाहून लक्षात येते.तुम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आणि पक्षाची वाताहात झाली. आधी स्वतःकडे बघा, मग इतरांवर बोला, असे म्हणत राऊतांवर हल्लाबोल केला आहे. माकड कोण आहे आणि वाघ कोण आहे हे जनतेला माहिती आहे. राऊतांनी कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलू नये नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला होता हे आपण बघितले. उद्योगपतीच्या घरी पोलिस अधिकाऱ्यामार्फत बॉम्ब ठेवणे, तो अधिकारी काय लादेन आहे का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp