
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरात यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद किंवा त्यांच्यावरील आरोपांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तपत्राचा जुना संदर्भ समोर आणत चाकणकर यांचा हा दावा खोडून काढला आहे. अंधारे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, खरात यांच्याशी संबंधित महिला शोषणाचे प्रकरण आणि त्यात रुपाली चाकणकर यांच्या एका पत्राचा स्पष्ट उल्लेख असल्याचे दिसून येत आहे. सुषमा अंधारे यांनी असा दावा केला आहे की, अशोक खरातच्या गैरकृत्यांबाबत बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका वृत्तपत्राकडून रुपाली चाकणकर यांनी वर्षभरापूर्वी लेखी माफीनामा लिहून घेतला होता. जर चाकणकर यांना खरातच्या प्रकरणाची माहितीच नव्हती, तर मग त्यांनी एका वर्षापूर्वी संबंधित वृत्तपत्राकडून माफीनामा का मागितला? असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटले की, रुपाली चाकणकर क्रमांक एकच्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रूपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होते. खरात याची दुष्यकृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न “खबरदार पुढारी” या एका स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकर बाईंनी माफीनामा घेतला. ज्या चाकणकर बाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असे सांगत आहेत, त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावे, “पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कधी वैष्णवी हगवणे कधी तनिषा दिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत साततात्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे? पुढे टीप म्हणून सुषमा अंधारे लिहितात, खबरदार पुढारीने दिलेले सदरील माफीनामा पत्र बघता रूपाली चाकणकरांना या खरात प्रकरणाची संपूर्ण माहिती एक वर्ष आधीपासूनच होती मात्र याच्या मुळाशी जाण्यापेक्षा पिढीचांवरच आणि पिढी त्यांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मानली हे विशेष आहे. या संदर्भातील हेही वृत्त वाचा अशा लिंगपिसाटाला मदत केल्यास जबाबदारी कोण घेणार? अंधारेंचा निशाणा; चाकणकरांनी पाद्यपूजा केल्याचा VIDEO समोर नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. “महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या ‘छत्रछाये’खालीच अशा भामट्यांचे उद्योग सुरू आहेत,” असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी देखील केली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



