digital products downloads

सात शिवारांच्या सीमेवर भरणार भक्तीचा मेळा!: वनोजा बाग येथील संत लखमाजी महाराज मंदिरात गुढीपाडवा सोहळा – Amravati News

सात शिवारांच्या सीमेवर भरणार भक्तीचा मेळा!:  वनोजा बाग येथील संत लखमाजी महाराज मंदिरात गुढीपाडवा सोहळा – Amravati News



अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा बाग येथील श्री संत लखमाजी महाराज संस्थान येथे गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. १९ मार्च रोजी होणाऱ्या या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या महोत्सवाला सुमारे ३०० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे. श्री संत लखमाजी महाराज संस्थान हे या भागातील एक प्राचीन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. ‘बाग’ या नावामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे. पूर्वी हा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला होता, जिथे दिवसाही अंधार असायचा. मोठ्या वृक्षांमुळे या जागेला ‘बाग’ असे संबोधले जात असे. हे मंदिर आजही सात शिवारांच्या सीमेवर वसलेले आहे, ज्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा, चिंचोली, गावंडगाव, सातेगाव तसेच दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई, येवदा आणि उमरी या गावांचा समावेश आहे. या सातही गावांतून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध असले तरी, त्यांची स्थिती अपुरी असल्याने भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पूर्वी उपोषणही करण्यात आले होते. सुमारे ६० वर्षांपूर्वी या मार्गावर ‘जंगल एसटी’ नावाची महामंडळाची बस धावत होती. गुढीपाडव्याचा उत्सव हा येथील सर्वात मोठा महोत्सव मानला जातो, ज्यात लाखो भाविक सहभागी होतात. या दिवशी व्यापारी वर्ग, महाप्रसाद आणि दोन ते तीन किलोमीटर परिसरात भाविक तंबू ठोकून किंवा झाडाखाली बसून प्रसादाचा कार्यक्रम करतात. घटस्थापनेपासून नऊ दिवस आणि पौष महिन्यातील पाच रविवारही येथे यात्रा महोत्सव साजरा होतो. संस्थानतर्फे भाविकांना पाणी टँकरसह आवश्यक सुविधा पुरवल्या जातात. धार्मिक कार्यासोबतच संस्थान विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवते. गुढीपाडव्याच्या दिवशी हजारो लोक महाप्रसादात सहभागी होतात. निराधारांना निवारा व अन्नाची व्यवस्था केली जाते. कोरोनाकाळात गरजूंना अन्नधान्य वाटप, गरीब मुलांच्या विवाहासाठी मदत, तसेच आदिवासी भागातील शेतमजुरांना अन्न व वस्त्रदान करण्यात आले आहे. याशिवाय, मंदिराच्या कळसाची स्थापना व होमपूजन यांसारखे धार्मिक विधीही येथे पार पडतात. संस्थानचे सचिव चंदन गायगोले यांनी ही माहिती दिली असून, भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा आणि काही अडचण असल्यास संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp