digital products downloads

अशोक खरातच्या फार्महाऊसवर क्राईम ब्रँचचा छापा: पिस्तूल, काडतुसे जप्त; भोंदूगिरीच्या बहाण्याने 15 वर्षांत जमवली कोट्यवधींची मालमत्ता – Nashik News

अशोक खरातच्या फार्महाऊसवर क्राईम ब्रँचचा छापा:  पिस्तूल, काडतुसे जप्त; भोंदूगिरीच्या बहाण्याने 15 वर्षांत जमवली कोट्यवधींची मालमत्ता – Nashik News



अंकशास्त्राच्या नावाखाली भोंदूगिरी करून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या पापकर्मांचा पाढा आता पोलीस तपासात वाचला जात आहे. नाशिक गुन्हे शाखेने खरातच्या सिन्नर येथील मिरगावमधील आलिशान फार्महाऊसवर रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी केवळ महत्त्वाची कागदपत्रेच नव्हे, तर एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत. या छाप्यानंतर खरातने गेल्या १५ वर्षांत गोळा केलेल्या सुमारे २०० कोटींच्या अघोषित मालमत्तेचे पुरावे समोर आले आहेत. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक मिरगावला पोहोचले. खरातच्या या फार्महाऊसवर केवळ ‘व्हीआयपी’ आणि सेलिब्रिटींचीच वर्दळ असायची. झडतीदरम्यान पोलिसांना तिथे एक पिस्तूल, काही वापरलेली आणि काही न वापरलेली काडतुसे सापडली आहेत. हे शस्त्र परवानाधारक आहे की बेकायदेशीर, याचा तपास आता पोलीस करत आहेत. याशिवाय, फार्महाऊसवरून मालमत्तेचे अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. भोंदूगिरीच्या आडून २०० कोटींची माया मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी असलेल्या खरातने गेल्या दीड दशकात राजकीय नेते, बडे सनदी अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठांनाही आपल्या ‘अंकशास्त्रा’च्या जाळ्यात ओढले होते. लष्करी शिस्तीचा आव आणणाऱ्या या भोंदूने या माध्यमातून प्रचंड संपत्ती जमा केली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पाथर्डी शिवार येथील विविध सर्व्हे क्रमांकांत (१३२, १३८, २०३ इ.) खरातची सुमारे ३० एकर जमीन असून, तिची बाजारभावानुसार किंमत १५० कोटींच्या घरात आहे. कहांडळवाडी व मिरगाव या भागात खरातची ४५ एकर जमीन असल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही त्याच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. ५८ व्हिडिओंचे गुपित धार्मिक आस्था आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे लैंगिक शोषण करणे, हा खरातचा खरा उद्योग होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. यामध्ये काही प्रभावशाली महिलांचेही चित्रीकरण असल्याची शक्यता असल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ म्हणवणारा खरात आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला असून, त्याच्यावर केवळ बलात्काराचाच नव्हे, तर अवैध शस्त्रसाठा आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हेही दाखल होण्याची शक्यता आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp