digital products downloads

गरज पडल्यास रुपाली चाकणकर यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस: काँग्रेसमध्येच संघर्ष उघड? शिंदे समर्थनात, लोंढे आक्रमक – Mumbai News

गरज पडल्यास रुपाली चाकणकर यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस:  काँग्रेसमध्येच संघर्ष उघड? शिंदे समर्थनात, लोंढे आक्रमक – Mumbai News



नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद समोर आले आहेत. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकर यांची बदनामी करू नये, अशी भूमिका घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, त्याच वेळी काँग्रेसच्या महिला आघाडीने चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले आहेत. अरविंद शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, रुपाली चाकणकर यांच्याविषयी नाहक बदनामी केली जाऊ नये. गरज पडल्यास त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी आपण शिफारस करू, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला शहराध्यक्ष चाकणकरांच्या बाजूने उभे राहत असताना दुसरीकडे पक्षाच्या महिला आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतल्याने काँग्रेसची अधिकृत भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पुणे शहर काँग्रेसच्या महिला आघाडीने चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसमध्ये याआधीही गटबाजीचे चित्र अनेकदा समोर आले आहे. उच्चपदस्थ नेत्यांचे एक मत आणि स्थानिक नेतृत्वाची वेगळी भूमिका यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. चाकणकर प्रकरणातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. अरविंद शिंदे यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. शिंदे यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे सांगत लोंढे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसची अधिकृत भूमिका चाकणकरांच्या विरोधात आहे. त्यांच्या मते, अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यात चाकणकर यांच्यावर नैतिक जबाबदारी येते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे. काँग्रेसमध्येच मतभेद उघड अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावरही याबाबत स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने या प्रकरणात निष्क्रिय राहणे योग्य नाही. त्यामुळे चाकणकर यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येच मतभेद उघड झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp