digital products downloads

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करताना वृद्धाची फसवणूक: दोन लाखांना घातला गंडा, कोथरूड पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल – Pune News

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करताना वृद्धाची फसवणूक:  दोन लाखांना घातला गंडा, कोथरूड पोलिसांकडून सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल – Pune News



पुण्यात सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक झाली, तर ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने एका महिलेला तीन लाख १९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. या दोन्ही प्रकरणी कोथरूड आणि चंदननगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोथरूड येथील एका ज्येष्ठ नागरिकाने समाज माध्यमांवर इलेक्ट्रीक शेगडीची जाहिरात पाहिली होती. गॅस टंचाईमुळे त्यांनी शेगडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करण्यास सांगितले आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तीन लाख दहा हजार रुपये दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. गॅस टंचाईचा फायदा घेत चोरट्यांकडून इलेक्ट्रीक शेगडी किंवा सिलिंडर देण्याचे आमिष दाखवले जात असून, नागरिकांनी अशा बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने ३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक दुसऱ्या एका घटनेत, चंदननगर भागातील एका ४८ वर्षीय महिलेला ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तीन लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर चोरट्यांनी महिलेला मोबाइलवर संदेश पाठवून ऑनलाइन काम केल्यास चांगले पैसे मिळतील असे सांगितले. एका तारांकित हॉटेलला ‘रिव्ह्यूज’ मिळवून देण्याचे काम असल्याचे भासवून त्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. सुरुवातीला चोरट्यांनी महिलेच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा केली, ज्यामुळे महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी तिला ‘ऑनलाइन टास्क’मध्ये अधिक पैसे गुंतवण्यास सांगितले. पैसे गुंतवल्यानंतर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून महिलेकडून पैसे जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर तिला कोणताही परतावा मिळाला नाही आणि मूळ रक्कमही परत मिळाली नाही. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp