digital products downloads

मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन: सलग तीन वेळा नगरसेविका राहिल्या, भाजपचा अभ्यासू आणि निष्ठावान चेहरा हरपला – Mumbai News

मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन:  सलग तीन वेळा नगरसेविका राहिल्या, भाजपचा अभ्यासू आणि निष्ठावान चेहरा हरपला – Mumbai News



भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, अनुभवी नगरसेविका आणि मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. भाजप पक्ष कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, अलका केरकर यांची अंत्ययात्रा आज (रविवार) सकाळी ११ वाजता त्यांच्या खार (पश्चिम) येथील मेफेयर अपार्टमेंट, १७ वा रस्ता, शिवाजी नगर समोरील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता सांताक्रूझ (पश्चिम), शास्त्री नगर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. महापौरपदाच्या शर्यतीतील आघाडीचे नाव अलका केरकर या केवळ भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच नव्हत्या, तर त्या मुंबई महानगरपालिकेतील एक अनुभवी चेहरा होत्या. सलग तीन वेळा मुंबई महापालिकेवर निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला होता. नुकत्याच झालेल्या २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ९८ मधून महायुतीच्या (भाजप-शिवसेना-रिपाई) उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे, महापालिकेतील नव्या गणितानुसार त्या महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या आघाडीच्या उमेदवारांपैकी एक होत्या. शिक्षिका ते लोकप्रतिनिधी: साधी राहणी, उच्च विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या अलका केरकर यांनी खऱ्या अर्थाने निवृत्त शिक्षिका म्हणून अत्यंत साधे जीवन जगले. २०१४ ते २०१५ या काळात त्यांनी मुंबईच्या उपमहापौरपदाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे सांभाळली होती. पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचाराला थारा न देण्याची त्यांची वृत्ती कार्यकर्त्यांसाठी नेहमीच आदर्श ठरली. आशिष शेलार यांनी वाहिली श्रद्धांजली आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केरकर यांच्या निधनावर गडद दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी समाज माध्यमावर म्हटले की, “अलका केरकर यांनी निवृत्त शिक्षिका म्हणून जगताना प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेचे सर्वोच्च निकष पाळले. कोणत्याही अनधिकृत गोष्टींशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावामुळे त्या सर्वांच्या आदरास पात्र ठरल्या. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी असलेली त्यांची बांधिलकी वांद्रे पश्चिम मतदारसंघासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे.”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp