digital products downloads

ज्याला मूल-बाळ नाही त्यांनाही व्हायचे: मिरगावातील ग्रामस्थाने सांगितले अशोक खरातचे किस्से, म्हणाले- बाबा जे सांगतो ते होतेच – Nashik News

ज्याला मूल-बाळ नाही त्यांनाही व्हायचे:  मिरगावातील ग्रामस्थाने सांगितले अशोक खरातचे किस्से, म्हणाले- बाबा जे सांगतो ते होतेच – Nashik News



महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या खरातच्या नादी लागल्याने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अशोक खरातबद्दल स्थानिक लोकांकडून काही माहिती समोर यायला लागली आहे. बाबाकडे गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतेच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले असल्याचे स्थानिकाने सांगितले आहे. मिरगावमध्ये अशोक खरातचे मोठे घर आहे. याच गावातील काही लोकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी एका इसमाने सांगितले की, “बाबाकडे (अशोक खरात) गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले होते. ज्याला मूल-बाळ होत नाही, त्याला सांगितल्यानंतर मूल-बाळ झाल. असे किस्से परिसरात ऐकले आहेत. त्या माणसाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. बाहेरचे अनेक लोक त्यांच्याकडे येत होते. बाबांनी असे करायला नको होते. परिसरात त्यांचे खूप मोठे नाव होते. आता गावाचे नाव बदनाम झाले असल्याचे येथील ग्रामस्थाने ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले आहे. पुढे बोलताना त्या ग्रामस्थाने सांगितले की, आमचा साहेबांशी (अशोक खरात) 9-10 वर्षांपासून परिचय आहे. आम्ही मूळचे इथलेच आहोत. त्यामुळे जाणे-येणे अगदी जवळून आहे. येथील शंकराचे मंदिर गावाची शानच आहे. मंदिरासाठी लोकांचा विरोध राहणार नाही. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकांचा त्यांना विरोध असेल. मीडियासमोर हे प्रकरण समोर आले. आम्हाला याची माहिती असती तर आमचे आणि त्यांचे संबंध वाईटच असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक लोकांना प्राधान्य दिले नाही ग्रामस्थाने पुढे सांगितले की, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या वेटिंगमुळे आम्ही कधी त्यांच्याकडे थांबलो नाही. ते स्थानिक लोकांना कधी प्राधान्य देत नव्हते. बाहेरचे लोक शनिवार-रविवारी भरपूर असायचे. आम्ही घरातील समस्या घेऊन जाणार होतो. पण आम्हाला त्याने वेळ न दिल्याने नंतर परत जाणे झाले नाही. आमचा घरगुती प्रॉब्लेम होता. वेळ न दिल्याने आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. राजकीय नेत्यांना त्यांच्याबद्दल माहिती असते तर तेही इथे आले नसते. या व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गावाचे नाव बदनाम झाले आहे. पैशांची मागणी व्हायची पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही बाहेरच्या लोकांना कधीच विचारले नाही, तुम्ही कशासाठी येता? आणि का येता? आमच्या समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी आम्हाला नाशिकला बोलावले होते. मात्र, आमच्या मनातच नव्हते नाशिकला जायचे.. कारण तिथे पैसे मागतात, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्याकडे काय पैसे नव्हते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp