digital products downloads

अशोक खरात फाईल्स एफस्टीन फाईल्सच्याही पुढे!: भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकता-अडकता कसे वाचलो? आव्हाडांनी सांगितली आपबिती – Mumbai News

अशोक खरात फाईल्स एफस्टीन फाईल्सच्याही पुढे!:  भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकता-अडकता कसे वाचलो? आव्हाडांनी सांगितली आपबिती – Mumbai News


नाशिकमधील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे आणि अघोरी कृत्यांचे प्रकरण आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. या प्रकरणावरून संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत खळ

.

अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. रविवारी ‘एसआयटी’ने अशोक खरातची तब्बल ७ तास कसून चौकशी केली. यावेळी स्वतःला महान शक्तीचा स्वामी मानणारा हा भोंदू पूर्णपणे खचलेला पाहायला मिळाला. “नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” असे क्षीण आवाजात म्हणत त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. यादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी देखील अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले.

नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जितेंद्र आव्हाड यांनी अशोक खरातच्या संदर्भात स्वतःचा अनुभव सांगताना म्हटले की, “हा अशोक खरात मलाही भेटण्यासाठी वारंवार गळ घालत होता. लोक त्याचे खूप कौतुक करायचे, त्यामुळे नेमका हा प्रकार काय आहे, हे पाहण्यासाठी मी एकदा त्याच्याकडे जायला निघालो होतो. मी शहापूरपर्यंत पोहोचलो सुद्धा होतो, मात्र त्याच वेळी नशिबाने मंत्रालयातून मला एक महत्त्वाचा फोन आला. त्या कामामुळे मी मधूनच माघारी फिरलो आणि या भोंदूच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचलो.”

चिंचुक्यांच्या अंगठीसाठी १ लाख रुपये!

अशोक खरात लोकांची कशी फसवणूक करायचा, यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “हा माणूस साधे चिंचुके पॉलिश करून ते अंगठीत बसवून द्यायचा आणि त्याचे चक्क १ लाख रुपये उकळायचा. नशीब हा ‘खरात’ आहे, जर तो ‘खान’ असता तर आतापर्यंत मोठा गदारोळ झाला असता.” या प्रकरणातील राजकीय कनेक्शनवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, जयंत पाटील, निलेश लंके यांच्यासह अनेक नेत्यांचे फोटो केवळ योगायोगाने आले नसून यामागे काहीतरी नक्कीच घडले असणार.

रिमोटवरचा ‘साप’ अन् अघोरी माया

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या कार्यालयात रिमोटवर चालणारा नकली साप आणि वाघाचे कातडे ठेवत असे. सापाची रिमोटने होणारी हालचाल पाहून लोक त्याला ‘दैवी चमत्कार’ समजत आणि भीतीपोटी त्याच्या अघोरी उपायांच्या आहारी जात असत. खरातच्या या विकृत प्रवृत्तीचा भांडाफोड त्याच्याच एका कर्मचाऱ्याने केला आहे. या कर्मचाऱ्याने बाबाच्या खासगी दालनात ‘स्पाय कॅम’ बसवून त्याचे सर्व चाळे एका पेन ड्राईव्हमध्ये कैद केले. हे पेनड्राइव्ह सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हे ही वाचा…

अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक:पोलिसांकडून कारवाई सुरू, या प्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही- CM देवेंद्र फडणवीस

विधानसभेत विरोधकांनी अशोक खरात प्रकरणावरून चांगलाच हल्लाबोल केला. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक शैलीत या संदर्भातील घटनेवर गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी अशोक खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचेच राजीनामे घेतले जावे, अशी मागणी केली. विरोक्षकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे. पूर्ण बातमी वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial