digital products downloads

ऐसी कौनसी बात थी की, और का हाथ पकडना पडा: उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘शायराना’ सवाल – Mumbai News

ऐसी कौनसी बात थी की, और का हाथ पकडना पडा:  उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ‘शायराना’ सवाल – Mumbai News



“राजकारण हा माझा पिंड नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचाच आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझे इतके उत्तम वर्णन केले, मला इतके जवळून ओळखले, मग ‘ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा’,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शायरीला ‘शायरी’नेच उत्तर दिले. विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित निरोप समारंभात उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी आणि राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले, मी या विधीमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की आपल्या ध्यानीमनी नसते आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणे हे मर्दाचे लक्षण नसते. त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारली. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. सर्व माझे त्यावेळचे आजी-माजी सहकारी, मंत्रिमंडळात होते. सगळे शासकीय अधिकारी, सर्व प्रशासन, सर्व अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसणारा माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसतो आणि तो राज्य चालवतोय. हे या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. उद्धव ठाकरेंना आठवला ‘तो’ दिवस उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय आपण मला निरोप देण्यासाठी स्वत: अगत्याने हजर राहिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला तो ही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल विधिमंडळात जे काही घडले ते बघून मला तो दिवस का आठवला ते सांगतो. कारण आपण म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचे भारूड. काट्याच्या आणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसई चिना, आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे आहे. आता ते आणीवरच्या तीन गावांमधील एक गाव आणीवर गेलेले आहे. बाकी गावांचे काय झाले? ते त्या गावकऱ्यांना माहिती आहे. आताच्या शतकात स्वार्थासाठी रेडे कापले जातात उद्धव ठाकरे म्हणाले, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते की, ज्ञानेश्वर महाराज १२ व्या, १३ व्या शतकात होऊन गेलेले आहेत. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. त्या शतकापासून या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? आपले खालच्या सभागृहातील निवेदन मी काळजीपूर्वक ऐकले. नाशिकच्या प्रकरणाबाबत आपण जी भूमिका घेतली, त्यासाठी धन्यवाद देतो. देशात बुवा नाही, तर युवा चमत्कार करू शकतात उद्धव ठाकरे म्हणाले, सिनेकलावंत अतुल कुलकर्णी यांचे एक चांगले वक्तव्य आहे. पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचे काय करायचे? आपण सगळ्यांनी एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे. सगळ्या राजकारणींनी ठरवले, तर बुवा शक्ती पेक्ष युवाशक्तीला आपण जास्त ताकद दिली पाहिजे. या देशात बुवा चमत्कार करू शकत नाही, युवा चमत्कार करू शकतात. युवाशक्तीला नीट पाठिंबा दिला, तर या बुवांची दुकाने बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्रीपद जसे अचानक आले तसे गेले उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रि‍पदानंतर मंत्रालयात प्रवेश केला होता, तो दिवस आठवतो. सर्वांच्या चेहऱ्यांवर आनंद होता. तो क्षण विसरु शकत नाही. मी वर्षा सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र बघून मी गहिवरुन गेलो होतो. हे सगळं प्रेम महाराष्ट्राने दिले, असे प्रेम थोड्या लोकांच्या नशिबात येते. वर्षा सोडून मातोश्रीत आलो, मुख्यमंत्रिपद सोडलेले नव्हते. मातोश्रीत बसून कारभार करत होतो, मंत्री घरी येत होते. त्यांना घरी बसूनच पदे दिली होती. त्यावेळी अधिकाऱ्याने विचारले मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेताना होतात तसेच आता आहात कसे काय? मी म्हटले जे आपले नसते, ते स्वीकारण्यात आनंदीत होण्याची गरज नसते आणि जे आपले नसते ते सोडण्यात दु:खी होण्याची काय गरज. मुख्यमंत्री पद जसे अचानक आले, तसे ते अचानक गेले. मी माझ्या घरी आलो. आपले घर आणि त्या घरातील आनंद हा मला वाटते सगळ्यांसाठी महत्त्वाचा असतो. ६ वर्षांपूर्वी ऑक्सिजन, तर आता गॅस सिलिंडरची कमी उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत रायगडाला निधी देण्याचा पहिला निर्णय होता. मंत्रिमंडळातील शेवटचा निर्णय होता औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतरण करणे. हे नामांतरण करून माझी कारकीर्द संपली. पण या मधल्या अडीच वर्षांचा कालखंड फार भनायक होता. संकटामागून संकटे येत होती. कोरोना सारखे भनायक संकट आले. अशी साथ शंभर वर्षांपूर्वी आली होती. कोरोना काळात सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले याचे मला समाधान आहे. सहा वर्षांपूर्वी ऑक्सिजन सिलेंडरची कमी होती आणि आता सहा वर्षांनंतर गॅस सिलिंडरची कमतरता आहे. हा पण एक विचित्र योगायोग आहे. कोरोना काळातील कामाचे डॉक्युमेंट करावे उद्धव ठाकरे म्हणाले, संकटात असताना कुणी धावून येत नाही. पण कोरोनात आपल्या महाराष्ट्राने जे काम केले, त्या कामाचे कौतुक तसे कुणी केले नाही. उत्तर प्रदेशमध्ये गंगेत मृतदेह वाहत होते. गुजरात सार्वजनिक चिता पेटल्या जात होत्या. पण महाराष्ट्रात कोणत्याही मृतदेहाची अवहेलना आपण होऊ दिली नाही. जास्तीत जास्त जीव वाचवण्याचे आपण प्रयत्न केले. मृतांचा आकडा आपण लपवला नाही. त्या सगळ्या कालखंडाचे डॉक्युमेंटेशन केले, त्यामध्ये कोणत्या व्यक्तीचे वैशिष्ट्य सांगण्याची आवश्यकता नाही. कोरोना काळात महाराष्ट्राने काय काम केले? याबाबत डॉक्युमेंटेशन केले, तर पुढे अशी साथ आली, तर आपण काय खबरदारी घ्यायला हवी, याचे मार्गदर्शन होईल, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. …तर आता विरोधीपक्ष नेते नियुक्त करा उद्धव ठाकरे यांनी वि.स. पागे यांच्यापासून विठ्ठलराव हांडे यांच्या नावांचा उल्लेख केला. विठ्ठलराव हांडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते, त्यांच्याकडे पुरेशी संख्या नव्हती. संख्याबळ नसताना त्यांना विरोधीपक्षनेते केले होते, मी बरोबर असेन तर आता विरोधीपक्ष नेते नियुक्त करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp