digital products downloads

दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळी कापली: अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट – Mumbai News

दादांच्या घराबाहेर काळी जादू, अनेक नेत्यांनी करंगळी कापली:  अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट – Mumbai News



“महाराष्ट्रात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूला दोन महिने उलटूनही पोलिस एफआयआर दाखल करत नाहीत, हे दुर्दैव आहे. अखेर राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार आम्ही कर्नाटक गाठले आणि तिथे ‘झिरो एफआयआर’ नोंदवून तो राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे वर्ग केला आहे,” अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी अजित पवार जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर ‘काळी जादू’ करण्यात आली होती आणि काही नेत्यांनी आपली करंगळी कापली होती, असा धक्कादायक दावा करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. “आम्ही मरीन ड्राईव्ह, बारामती पोलिस आणि सीआयडीकडे वारंवार खेटे घातले, पण गुन्हा नोंद झाला नाही. साधी चप्पल चोरीला गेली तरी एफआयआर होतो, मग राज्याच्या नेत्याच्या बाबतीत इतकी दिरंगाई का? आम्ही राहुल गांधींना भेटलो, ते म्हणाले ज्या राज्यात न्याय मिळू शकतो अशा राज्यांत जावा, गवई साहेबाचे उदाहरण आहे. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर गुन्हा दाखल झाला, मी त्या राज्याचे आभार मानतो. मी फक्त कर्नाटकात गेलो, तिथे एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ०० ने तो तपासासाठी महाराष्ट्राकडे पाठवला आहे.” दादांच्या घराबाहेर काळी जादू रोहित पवार यांनी यावेळी जादूटोणा आणि भोंदूगिरीच्या अंगाने गंभीर आरोप केले. “अजित दादा जिवंत असताना त्यांच्या मुंबईतील आणि बारामतीतील घराबाहेर ‘ब्लॅक मॅजिक’ करण्यात आली होती. दादांचे पद मिळावे आणि त्यांची ताकद कमी व्हावी या हेतूने काही नेत्यांनी चक्क आपली करंगळी कापल्याचेही समोर आले आहे. अशोक खरात प्रकरणाशी याचे धागेदोरे जुळतात का, हे तपासणे गरजेचे आहे. सत्तेसाठी कोणी कोणी हा अघोरी प्रकार केला, हे लवकरच स्पष्ट होईल,” अशी मागणीही त्यांनी केली. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट हल्ला चढवला. “सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या दबावामुळेच जय पवार यांची पत्रकार परिषद होऊ शकली नाही. प्रफुल्ल पटेल यांना या प्रकरणाचा तपास व्हावा असे वाटत नाही. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ अद्याप अमेरिकेला गेलेलाच नाही. एव्हिएशन क्षेत्रातील अनेक अधिकारी पटेलांच्या ओळखीचे असल्याने या तपासात अडथळे आणले जात आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. भाजपला अजित पवारांचा पक्ष संपवायचाय राजकीय भविष्याबाबत भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, “भाजपला आता अजित पवारांचा पक्ष संपवायचा आहे. दादांच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यांना भाजपकडून उभे करण्याचा विचार सुरू आहे. आता त्यांचा फोकस एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडे वळला आहे. उद्या आम्ही या संदर्भात अनेक कागदपत्रे आणि गौप्यस्फोट करणार आहोत. मंत्र्यांचेच प्रश्न सुटत नसतील तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे?”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp