digital products downloads

तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने महाराजस्व अभियानाचा फज्जा: राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांनीही भाषणातून व्यक्त केली तीव्र नाराजी‎ – Chhatrapati Sambhajinagar News

तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने महाराजस्व अभियानाचा फज्जा:  राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांनीही भाषणातून व्यक्त केली तीव्र नाराजी‎ – Chhatrapati Sambhajinagar News


येथे मंगळवारी (२४ मार्च) शासनाच्या महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. परंतु अभियानास वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता तिसऱ्या फळीतील अधिकारी उपस्थित झाल्याने या अभियानाचा फज्जा उडाला. यामुळे येथे उपस्थित राजकीय पुढारी

.

शासनाच्या महसूल विभागाने महाराजस्व अभियान सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून करमाड येथे कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, पंचायत, तहसील या दोन्ही विभागांचे प्रमुख अधिकारी या शिबिरास अनुपस्थित दिसून आले. त्यामुळे जि.प. माजी अध्यक्ष रामूकाका शेळके, बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ उकर्डे यांनी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नाराजी व्यक्त केली. या शिबिरात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी मार्गदर्शन केले. मात्र, इतर अधिकारी गैरहजर होते.

पुढील कार्यक्रम कसाबसा उरकण्यात आला तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वनाधिकारी यासारखे अनेक अधिकारी उपस्थित नसल्याने उपस्थित राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, कार्यक्रमाच्या मध्यात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड उपस्थित झाल्याने बंद पडण्याच्या स्थितीत असलेला कार्यक्रम कसाबसा उरकण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp