
हिंगोली जिल्हयातील नागरीकांना त्यांच्या मोबाईलवर शासकिय योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रे याची माहिती मिळण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेचे व्हॉटस्अप चॅटबोट विकसीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता नागरीकांना घरी बसून त्यांच्या मोबाईलवर शासकिय योजनांची माहिती मिळणार आहे. राज्य शासनाकडून नागरिकांसाठी वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र अनेक वेळा या योजनांची माहिती गावपातळीवर लाभार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी योजनापासून वंचित राहतात. या शिवाय अनेक वेळा गावकरी शासकिय कार्यालयात आल्यानंतर त्यांना समाधानकारक माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारीही प्राप्त होत होत्या. यावर पर्याय म्हणून हिंगोली जिल्हा परिषदेचे व्हॉट्सॲप चॅटबोट विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाॅटस्अप चॅटबोट विकसीत करण्यात आले. यामध्ये एक व्हॉटसअप क्रमांक देण्यात आला असून त्यावर नागरीकांंनी संपर्क केल्यानंतर त्यांना केंद्र व राज्य शासनाचे विभाग दिसणार आहेत. त्यानंतर ज्या विभागाच्या योजनांची माहिती हवी आहे त्या विभागावर क्लिक केल्यानंतर सर्व योजनांची माहिती मिळणार आहे. यामध्ये योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे याची माहिती देखील मिळणार आहे. गावकऱ्यांना घरी बसून मोबाईलवर सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांची मोठी सोय झाली आहे. गावकऱ्यांना आता मोबाईलवर सर्व योजनांची माहिती मिळणार असल्याने पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे होणार नाही. नागरीकांनीही या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अंतर विभागीय समन्वय पोर्टल या सोबतच अंतर विभागीय समन्वय पोर्टल हे तालुकास्तर व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या समस्या, मागणी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी विकसीत करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



