
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम सुवर्ण बाजारावर दिसून आला आहे. बुधवारी वायदे बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ३८११ रुपयांची वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,५०,३८० लाख रुपये झाला, तर चांदीमध्ये तब्बल ९२७० रुपयांची वाढ झाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीला पसंती दिली आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने व चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मंगळवारी १,४६,५६९ रुपये असणारे सोने बुधवारी १,५०,३८० रुपये झाले तर चांदी २,४१,०२० रुपयांवरून थेट २,५०,२९० रुपये प्रति किलो झाली. बाजारात सध्या तेजी असली तरी संस्थात्मक गुंतवणूकदार नफ्यासाठी विक्री करत आहेत. त्यामुळे या धातूत घसरण सुरू होती. परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केल्यामुळे दरवाढीला अधिक गती मिळाली आहे. नजीकच्या काळात सोन्याचे भाव उच्चांकी स्थिर राहू शकतात. जागतिक घडामोडींनुसार चढ-उतार अपेक्षित आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



