digital products downloads

बोलत नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार!: मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी, मुलुंड परिसरात खळबळ – Mumbai News

बोलत नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार!:  मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी, मुलुंड परिसरात खळबळ – Mumbai News



एका 16 वर्षीय तरुणीने केवळ बोलणे बंद केल्याच्या रागातून तिच्याच ओळखितल्या एका तरुणाने तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आशिष बनसोड असे आरपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूरचे रहिवासी असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपासून काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपी आशिषसोबत बोलणे बंद केले होते. याचाच राग मनात धरून आशिष मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ गेला आणि मुलीला गाठले. यावेळी सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीच्या गळ्यावर वार केला. मुलीच्या सोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करत गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर हा हल्ला केल्यानंतर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपी आशिषने दिली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आशिष बनसोड या आरोपीला शस्त्रासह अटक केली असून, त्याच्यावर यापूर्वीही बदलापूरमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुलुंड पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ही घटना केवळ वैयक्तिक गुन्हा नसून समाजातील महिलांच्या वाढत्या असुरक्षिततेचे भीषण वास्तव मांडणारी आहे. मुंबईसारख्या शहरात भरदिवसा होणारे असे हल्ले चिंतेचा विषय ठरत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदे, पोलिसांची वाढीव सतर्कता आणि सामाजिक जागरूकता निर्माण होणे आता अनिवार्य झाले आहे. या निमित्ताने प्रशासनाने ठोस पावले उचलून महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp