digital products downloads

बनावट औषध पुरवठा प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला: महाराष्ट्र, यूपी, उत्तराखंडमध्येही पुरवठा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय – Nagpur News

बनावट औषध पुरवठा प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला:  महाराष्ट्र, यूपी, उत्तराखंडमध्येही पुरवठा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय – Nagpur News



बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणात, पुरवठादार कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल आहेत. आरोपी रॉबिन उर्फ हिमांशू विजयकुमार तनेजा याचा जामीन रद्द करून त्याला तत्काळ कोठडीत पाठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या रॅकेटने नागपूर येथील शासकीय रुग्णालयासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही बनावट औषधांचा पुरवठा केला होता. आरोपीने किमान १५ ते १६ कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे बँक खात्यातील नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी २०२३ मध्ये झाली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयातून औषध निरीक्षकांनी ‘सिप्रोफ्लोक्सीन रेसीप-५००’ या औषधाचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला होता. डिसेंबर २०२३ मध्ये, हे औषध बनावट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला. अहवालानंतर औषध निरीक्षकांनी चौकशी केली असता, हे औषध मे. जया इंटरप्रायझेस, लातूर यांच्याकडून जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर औषध भांडार येथे पुरवले गेल्याचे उघड झाले. तसेच, मे. अॅक्वेन्टिस बायोटेक प्रा. लि., नारपोली, भिवंडी यांनी मे. जया इंटरप्रायझेस, लातूर यांना पुरवठा केल्याचे समोर आले. चौकशीत असेही दिसून आले की, मे. अॅक्वेन्टिस बायोटेक प्रा. लि. यांनी बनावट औषधे मे. काबीज जनरिक हाऊस, पूनम विहार, मीरा रोड, ठाणे यांच्याकडून खरेदी केली होती. औषधांच्या कार्टन बॉक्सवर नमूद असलेली उत्पादक कंपनी मे. रेफंट फार्मा प्रा. लि., केरळ ही अस्तित्वात नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी काबीज जनरिक हाऊसचा संचालक विजय शैलेंद्र चौधरी याला अटक केली. त्यानंतर, साखळी पुरावे जोडून रॉबिन उर्फ हिमांशू विजयकुमार तनेजा आणि त्याचा भाऊ रमन विजयकुमार तनेजा यांच्यासह द्वारिका नॅचरल फॉर्म्युलेशन या कंपनीचा मालक अमितकुमार सुरेशचंद धिमान यांनाही अटक करण्यात आली. या टोळीने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये बनावट औषधे वितरित केली होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp