digital products downloads

जळगाव‎ मनपात ठाकरेंच्या शिवसेनेत ‎पटेल अन् पाटलांचे पटेना‎: एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे टोकदार बाण‎ – Jalgaon News

जळगाव‎ मनपात ठाकरेंच्या शिवसेनेत ‎पटेल अन् पाटलांचे पटेना‎:  एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे टोकदार बाण‎ – Jalgaon News



शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत ‎गटबाजी टोकाला पोहोचली आहे.‎ जिल्हाप्रमुखांनी गटनेत्यांवर ‎गद्दारीचा आरोप केल्यानंतर‎ शाब्दिक चिखलफेक सुरू झाली‎ आहे. विधानसभा निवडणुकीत ‎पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात ‎बंडखोरी अन् मनपात आईची माघार घेऊन जिल्हाप्रमुखांनीच ‎गद्दारी केल्याचा आरोप इब्राहिम‎ पटेल यांनी केला. तर गटनेते पटेल‎ यांनी संपर्क प्रमुखांना फोन करून ‎स्वीकृतच्या प्रस्तावासाठी प्रत्येकी‎ 20 लाखांची मागणी केल्याचा ‎पलटवार जिल्हाप्रमुख कुलभूषण ‎पाटील यांनी केला.‎ महापालिकेत स्वीकृत‎नगर सेवकाच्या एका जागेसाठी‎ ठाकरे गटाच्या दोन्ही गटांकडून ‎वेगवेगळे प्रस्ताव दाखल करण्यात‎ आले आहेत. जिल्हाप्रमुख ‎कुलभूषण पाटील यांनी इब्राहिम ‎पटेल यांच्यावर शिस्तभंगाच्या ‎कारवाईचे संकेत दिल्याने खळबळ ‎उडाली. मात्र, पटेल यांनी हे सर्व‎ दावे फेटाळून जिल्हाप्रमुखांच्या ‎अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित ‎केले आहे. आम्ही पाच पैकी चार‎ नगरसेवक एकत्र आहोत. गटनेता ‎बदलण्यासाठी सर्व नगरसेवकांची‎ विभागीय आयुक्तांकडे उपस्थिती‎ अनिवार्य असते. त्यामुळे माझ्यावर ‎कारवाई होऊ शकत नाही. पक्षाचे ‎वरिष्ठ नेते खासदार संजय राऊत ‎आणि विनायक राऊत यांच्याशी‎ चर्चा झाली आहे. लवकरच मुंबईत‎ जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची‎ भेट घेणार आहे, अशी माहिती ‎इब्राहिम पटेल यांनी दिली.‎ पक्षादेश हाच महत्त्वाचा‎ पक्षाचा गटनेता बदलाचा निर्णय ‎‎पक्षप्रमुखांच्या ‎‎मान्यतेने पक्षाच्या‎‎ सचिवांनी दिला‎‎ आहे. तसे पत्र‎‎ विभागीय‎‎ आयुक्तांकडे ‎दिले आहे. गटनेता बदलाचा निर्णय‎ आम्ही घेतला नसून पक्षाचा आदेश‎ आहे. पटेल यांनी संपर्क प्रमुखांना‎ फोन करून स्वीकृतचा प्रस्ताव ‎देण्यासाठी प्रत्येकी 20 लाखांची‎ मागणी केली आहे. ही गद्दारी नव्हे‎तर दुसरे काय आहे?‎- कुलभूषण पाटील,‎ जिल्हाप्रमुख, ठाकरे गट‎ आम्ही गद्दारी केली नाही‎ मी स्वीकृत सदस्याचा प्रस्ताव‎‎ दाखल करून‎‎ कोणतीही गद्दारी‎‎ केलेली नाही.‎‎ मी पक्षासोबतच‎‎ आहे. जळगाव‎‎ विधानसभा ‎निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या ‎विरोधात अपक्ष कोण लढले? ‎मनपा निवडणुकीत भाजप उमेदवार‎विरोधात आईचा अर्ज कोणी मागे ‎घेतला? भाजप-शिवसेनेचे 12 ‎नगरसेवक बिनविरोध कसे निवडून ‎आले? हे तपासायला हवे. इब्राहिम पटेल,‎ नगरसेवक, ठाकरे गट‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp