digital products downloads

हिंगोलीच्या पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा: क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, ऑनलाईन बैठकांतून मंजूर झालेली कामेही रद्द करण्याची मागणी – Hingoli News

हिंगोलीच्या पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा:  क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा, ऑनलाईन बैठकांतून मंजूर झालेली कामेही रद्द करण्याची मागणी – Hingoli News



हिंगोली जिल्ह्याचे झेंडामंत्री म्हणून ओळख निर्माण झालेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथीत व्हिडिओ प्रकरणामुळे हिंगोलीचे नाव धुळीला मिळाले असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करून ‘आर्थिक हिताची’ कामे करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शासनाने राजीनामा घ्यावा अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले की, हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिंगोलीच्या पहिल्याच दौऱ्यात हिंगोली गरिब जिल्हा असल्याचे सांगत जिल्हावासीयांच्या जखमेवर मिठ चोळले. पहिल्याच भेटीतून ते जिल्हयात काय विकास करणार हे स्पष्ट झाले होते. हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी हिंगोली जिल्ह्यात कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला नाही. हिंगोली जिल्हयात मागील दोन ते तीन वर्षापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या नाहीत. हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांच्या पिकविम्याच्या प्रश्‍नावर त्यांनी काधीही विमा कंपनीला धारेवर धरले नाही. विमा कंपनीने केवळ 25 टक्के अग्रीम रक्कम दिल्यानंतर पुढील रक्कम शेतकऱ्यांना दिलीच नाही. त्याकडेही पालकमंत्री झिरवाळ यांनी लक्ष दिले नाही. हिंगोली जिल्हयाच्या नियोजन समितीच्या बैठका घेतांना ऑनलाईन बैठका घेतल्या. यामध्ये शेतकऱ्यांना वेळेवर रोहित्र मिळत आहे किंवा नाही याची साधी विचारणाही त्यांनी केली नाही. आजही रोहित्रासाठी शेतकऱ्यांना विज कंपनीच्या चकरा माराव्या लागत आहेत. एकीकडे लिगो प्रकल्पामुळे हिंगोलीचे नाव अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून दुसरीकडे पालकमंत्री झिरवाळांच्या कथीत व्हिडिओने हिंगोलीचे नाव मात्र पार धुळीला मिळाले आहे. त्यामुळे केवळ आर्थिक हिताची कामे जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेली कामे रद्द करावीत तसेच पालकमंत्री झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी दिला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp