digital products downloads

पुण्यातील रामवाडीत सर्वधर्म समभावाचा आदर्श: मुस्लिम खान कुटुंब तीन पिढ्यांपासून साजरा करते रामनवमी उत्सव – Pune News

पुण्यातील रामवाडीत सर्वधर्म समभावाचा आदर्श:  मुस्लिम खान कुटुंब तीन पिढ्यांपासून साजरा करते रामनवमी उत्सव – Pune News



पुणे, प्रतिनिधी: देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, पुण्यातील रामवाडी येथील एका मुस्लिम कुटुंबाने सर्वधर्म समभावाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. खान कुटुंबाची तिसरी पिढी गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमी उत्सवात सक्रिय सहभाग घेत आहे. रामवाडीतील राम मंदिरात साजरा होणाऱ्या या उत्सवात इक्रम खान हे मनापासून सहभागी होतात. त्यांच्या कुटुंबाची ही परंपरा १९३२ सालापासून सुरू आहे. त्यांचे आजोबा मोसा खान आणि वडील इसा खान यांनीही या उत्सवात सातत्याने सहभाग घेत विविध प्रकारे सहकार्य केले होते. हीच परंपरा पुढे नेत, पुणे गोल्फ क्लबचे कॅप्टन आणि उद्योजक इक्रम खान तसेच त्यांचे पुत्र अहद इक्रम खान यांनीही उत्सवात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या या सहभागामुळे समाजात एकोपा आणि सौहार्द वाढीस लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीत सर्वधर्म समभाव, एकात्मता आणि बंधुभावाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असताना, खान कुटुंबाने जपलेली ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. विविध धर्मामध्ये सामाजिक सलोखा रावा यादृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे. त्यांच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे. या उत्सवाच्या वेळी संतोष देवकर, सुहास मल्लाव, विजय शितोळे, शांतीलाल गलांडे, प्रसाद देवकर, तोळेश्वर देवकर, दत्तात्रय देवकर, विजय देवकर, गोविंद गलांडे, विजय गलांडे, संदीप कांबळे, आकाश देवकर, अभिनव देवकर, कुणाल देवकर, आकाश गलांडे यांच्यासह पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp