digital products downloads

बांपेवाडा–उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीचा धुमाकूळ: संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन, साकोली–तिरोडा मार्ग बंद – Nagpur News

बांपेवाडा–उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीचा धुमाकूळ:  संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन, साकोली–तिरोडा मार्ग बंद – Nagpur News



भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात नरभक्षक वाघिणीने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशत निर्माण केली आहे. या वाघिणीच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. वाघिणीचा वावर असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले असून, प्रशासनाच्या संथ कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी साकोली–तिरोडा मार्ग २९ मार्च रोजी रोखून धरला होता. दोन आठवड्यांत दोन मोठे हल्ले दिनांक १९ मार्च रोजी बांपेवाडा येथील ५० वर्षीय वसंता मेश्राम यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले होते.या घटनेची शाई वाळते न वाळते तोच,२८ मार्च रोजी उमरझरी येथील ५५ वर्षीय माया रामकृष्ण सोनवाने यांच्यावर वाघिणीने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात माया सोनवाने गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एकामागून एक होत असलेल्या या प्राणघातक हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात नरभक्षक वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचा संताप आणि जाळपोळ जखमी माया सोनवाने यांना वनविभागाकडून वेळेत मदत आणि उपचार न मिळाल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संयम सुटला. संतप्त नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत साकोली–तिरोडा मार्ग पूर्णपणे बंद केला. आंदोलनादरम्यान संतप्त जमावाने जाळपोळही केली, ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत या नरभक्षक वाघिणीचा बंदोबस्त होत नाही आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. वन विभागाची शोधमोहीम तीव्र घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाने वाघिणीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली आहे. परिसरात तातडीने पिंजरे लावण्यात आले असून शीघ्र कृती दल भंडाराच्या टीमला बोलाविण्यात आले आहे. वाघिणीवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात तात्पुरता टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, नरभक्षक वाघीण दिसताच तिला ट्रॅंक्विलायझर गनद्वारे बेशुद्ध करून पकडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाचे आवाहन आणि सतर्कता सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस आणि वन विभागाचे पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वाघिणीला पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि ड्रोनचा वापर करण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे गावकऱ्यांवर वारंवार हल्ला करणाऱ्या वाघाला जेरबंद करून हलविण्यात येईल. जखमी माया सोनवणे यांना वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांनी खासगी दवाखान्यात घेऊन गेले नसल्याने त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. जखमीला पुढील उपचारासाठी नागपूर येथील जी.बी.रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. उपचाराचा खर्च वनविभाग भंडारा करेल. जखमीला आर्थिक साहाय्य मिळण्याकरिता शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात येईल. शिवणटोला येथून होणारी जडवाहतूक सुरू करण्याकरिता उपसंचालक साकोली हे लवकरच बैठक घेऊन त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार पुढील दिशा ठरवतील. गावाच्या शेती भोवती लोखंडी जाळीचा कुंपणाचा प्रस्ताव वनविभाग भंडारा यांच्याकडे सादर करण्यात येईल. गावकऱ्यांच्या चर्चेनुसार नव्याने होत असलेल्या बफर क्षेत्रास गावकऱ्यांचा विरोध होत असून यावर चर्चा करण्यासाठी तत्काळ सभा घेऊन गावकऱ्यांचे समाधान करण्यात येईल. शासनमान्य मजुरी गावातील महिलांना मिळाली नसल्याने त्यांना त्यांची उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल व त्यांची मजुरी अदा करण्यात येईल. आठ दिवसांत या मागण्या निकाली काढल्या जातील, असे लेखी आश्वासन सहाय्यक वनसंरक्षक मनीषा चव्हाण यांनी २९ मार्च रोजी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp