digital products downloads

गडचिरोलीत लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला: बस-स्कॉर्पिओच्या भीषण धडकेत 5 जण ठार, 6 जण गंभीर; कुरुडजवळील घटना – Nagpur News

गडचिरोलीत लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला:  बस-स्कॉर्पिओच्या भीषण धडकेत 5 जण ठार, 6 जण गंभीर; कुरुडजवळील घटना – Nagpur News



गडचिरोली जिल्ह्यात एका आनंदाच्या सोहळ्याचे रूपांतर भीषण शोकांतिकेत झाले आहे. चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथून लग्नाचा सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या स्कॉर्पिओ गाडीला खाजगी ट्रॅव्हल्स बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड गावाजवळ रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्व प्रवासी चामोर्शी तालुक्यातील रामपूर येथील एका लग्न समारंभासाठी गेले होते. सोहळा आटपून सायंकाळी सातच्या सुमारास हे वऱ्हाड आपल्या गावी परतत असताना हा अपघात घडला. “काही वेळापूर्वी जे वऱ्हाड आनंदाने नाचत-गाजत होते, त्यांच्यावर असा प्रसंग ओढवेल असे कोणालाही वाटले नव्हते,” अशी भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. घराच्या उंबरठ्यावर पोहोचण्यापूर्वीच पाच जणांचा प्रवास कायमचा थांबला. स्थानिकांकडून मदतकार्य; जखमींची प्रकृती चिंताजनक अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या गाडीतून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठी मदत केली. जखमी सहा जणांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महामार्गावर वाहतुकीची कोंडी अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हे ही वाचा… संभाजीनगरमधील गजानन हॉस्पिटलला भीषण आग:अनेक रुग्ण जखमी, सर्व रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले, बचावकार्य युद्धपातळीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध गजानन महाराज मंदिर परिसरात असलेल्या गजानन हॉस्पिटलमध्ये आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेले अनेक रुग्ण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp