digital products downloads

भोंदू अशोक खरातचे मोठमोठ्या नेत्यांशी धागेदोरे: त्याला आत्महत्या किंवा इतर काही दाखवून संपवण्याचा डाव, रोहित पवारांचा आरोप – Maharashtra News

भोंदू अशोक खरातचे मोठमोठ्या नेत्यांशी धागेदोरे:  त्याला आत्महत्या किंवा इतर काही दाखवून संपवण्याचा डाव, रोहित पवारांचा आरोप – Maharashtra News



राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरातला पोलिस कोठडीतच आत्महत्या किंवा इतर काही दाखवून संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप केला आहे. खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत जाऊन पोहचलेत. त्यामुळे त्याला आत्महत्या किंवा इतर काही दाखवून संपवण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या दाव्यामुळे भोंदू खरातच्या सुरक्षेविषयी मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर नाशिक पोलिसांत तब्बल 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, तर उर्वरित 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. खरातशी संबंध असल्याच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता त्यांची एसआयटी चौकशीही होणार आहे. याशिवाय या प्रकरणात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेत्यांची नावे आल्यामुळे त्यांच्याही मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी उपरोक्त आरोप केला आहे. काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार मंगळवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय, असे ते म्हणालेत. प्रफुल्ल पटेल, तटकरेंचा राष्ट्रवादी हायजॅक करण्याचा प्रयत्न दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, अजित दादांच्या NCP पक्षांतर्गत त्यांनी काय करावे, काय करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी अजित दादांचा पक्ष हायजॅक करण्याचे अनेक प्रयत्न केले त्यातील पक्षाची घटना बदलून काही महत्त्वाचे फ्रंटल सेल बंद करण्याचा निर्णय घेतला हा पुरावा पुढे आलेला आहे. अजित दादांच्या पक्षातील स्वतःला अजित दादा प्रेमी म्हणवणारे अजितदादांना न्याय मागण्यासाठी मात्र कधीही पुढे आले नाहीत आता मात्र पटेल ,तटकरे,चाकणकर यांची बाजू घेण्यासाठी मात्र काही जण पुढे येऊन चाटुगिरी करत आहेत. या सर्व कुटील कारस्थानामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी कसरत होत असावी असे वाटते. त्यांच्या पक्षातील काही अजितदादा प्रेमी निष्ठावंत मंडळी अस्वस्थ आहेत हे लपून राहिलेले नाही, असे ते म्हणालेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp