digital products downloads

पुणे मनपाची अनधिकृत केबल्सवर धडक कारवाई: शहरात 3600 किमी केबल्स अनधिकृत, जीवितहानीचा धोका – Pune News

पुणे मनपाची अनधिकृत केबल्सवर धडक कारवाई:  शहरात 3600 किमी केबल्स अनधिकृत, जीवितहानीचा धोका – Pune News



पुणे महानगरपालिकेने शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी बुधवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शहराचे विद्रुपीकरण आणि जीवितहानीचा धोका यामुळे ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोहीम दर आठवड्याला विविध भागांत राबवली जाईल. या मोहिमेअंतर्गत, पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसरात आज अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचा विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, कार्यकारी अभियंता योगेश माळी, उप अभियंता जयदीप अडसूळ, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी पोटफोडे, सहाय्यक विभागीय अधिकारी विजय भिलारे, स्टेशन ऑफिसर प्रभाकर उमरकर, समीर शेख आणि प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. भिमाले यांनी सांगितले की, नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल्स टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर अनधिकृतपणे केबल्स टाकल्या आहेत. यामुळे शहरात अनेक ठिकाणी केबल्सचे गुंतागुंतीचे जाळे निर्माण झाले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. विशेषतः गायरोप केबल्समध्ये ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याचा धोका आहे. केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य आहे. विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी रितसर परवानगी घेऊन केवळ भूमिगत केबल्स टाकाव्यात, असे आवाहन भिमाले यांनी केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर भविष्यात कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी माहिती दिली की, जानेवारीपासून काही भागांत प्राथमिक कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत १२३.६ किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटवण्यात आल्या आहेत. ही मोहीम आता अधिक तीव्र केली जाईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp