
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पद केवळ नाममात्र असून, त्यात काम करण्यास स्वारस्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. त्यांनी बुधवारी आपला राजीनामा सादर केला. ॲड. एडतकर यांची साधारणतः वर्षभरापूर्वी या पदावर निवड करण्यात आली होती. मात्र, हे पद केवळ नाममात्र असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे या पदावर काम करण्यात त्यांना कोणतेही स्वारस्य राहिले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेत्या तथा राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे. व्यवसायाने पत्रकार असलेले ॲड. एडतकर यांच्याकडे काँग्रेस पक्षाने प्रदेश प्रवक्ते पदही सोपवले आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे नेमके आणखी काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



