digital products downloads

लासलगावी कावड मिरवणुकीने वेधले लक्ष‎: नांदूर मधमेश्वरच्या गोदाजलाने मारुतीरायाला अभिषेक; संत नामदेव मंदिरातही कार्यक्रम – Nashik News

लासलगावी कावड मिरवणुकीने वेधले लक्ष‎:  नांदूर मधमेश्वरच्या गोदाजलाने मारुतीरायाला अभिषेक; संत नामदेव मंदिरातही कार्यक्रम – Nashik News



शहरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पारंपरिक कावड मिरवणूक काढली. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. श्रीराम मंदिर परिसरातील हनुमान मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे श्रीराम मंदिरात भाविकांनी हनुमान चालिसा पठण केली. यावेळी ‘बोल बजरंग बली की जय’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. श्रीराम मंदिर, अहिल्यादेवी चौक, गणेश चौक, पाटील गल्ली, शिंपी गल्ली, टिळकरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाजारपेठमार्गे कावड यात्रा काढण्यात आली. नांदूरमधमेश्वर येथील गोदावरी नदीतून भाविकांनी आणलेल्या पवित्र जलाने हनुमान मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. किल्ला परिसरात महिलांनी कावडधारकांचे विधीवत पूजन केले. याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, हनुमान भक्तमंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उत्सवानंतर सायंकाळी येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लासलगाव शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त कावड मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक. संत नामदेव मंदिरात सोहळा शहरातील श्री संत नामदेव मंदिरातही पहाटे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्त ऋषी टापसे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष मोहित बकरे, अरविंद टापसे, अनिल बकरे, अशोक क्षीरसागर, सुधीर झांबरे समाजबांधव उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp