digital products downloads

अंजनगावात रातोरात पुतळा; दोन गटात तणाव‎: शिवरायांच्या पुतळ्यावरून गावात तणाव, दोन्ही समाज आपलेच, शांततेने मार्ग काढू- मनोज जरांगे – Solapur News

अंजनगावात रातोरात पुतळा; दोन गटात तणाव‎:  शिवरायांच्या पुतळ्यावरून गावात तणाव, दोन्ही समाज आपलेच, शांततेने मार्ग काढू- मनोज जरांगे – Solapur News



सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा वाद चिघळू न देता दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. मराठा असो वा धनगर, दोन्ही समाज आपलेच आहेत. एकमेकांमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा आपण शांत डोक्याने एकत्र बसून या विषयावर निश्चितपणे मार्ग काढू शकतो, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आणि धनगर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे का? पुतळ्याच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा कोणाचा डाव आहे का? यावर आपण सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. नेमके प्रकरण काय? अंजनगाव (ता.माढा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ‎पुतळा खेलोबा मंदिर समितीच्या जागेत उभारल्यावरुन ‎गुरुवारी सकाळपासून मंदिर समितीच्या आवारातील पुतळा‎ हटवण्यासाठी मानकरी फरांडे महाराज यांच्यासह‎ परिसरातील समाज बांधव ठिय्या मारुन बसले होते. पोलिस‎ अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंदिराच्या जागेत पुतळा‎ असल्यास हटवण्याच्या सूचनेस पुतळा समर्थकांनी संमती‎ दिली असली तरी मंदिर समितीने विनापरवाना पुतळा‎ हटवा, मगच जागा मोजणी करा, अशी भूमिका घेतल्याने‎ तोडगा निघाला नाही. दुसऱ्या दिवशी गावातील वातावरणात ‎तणाव होता. आमदार अभिजीत पाटील, ओबीसी नेते ‎लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांशी गुरुवारी संवाद साधून पण‎ शिष्टाई निष्फळ ठरली.‎ प्रशासनाने मंदिराच्या जागेची मोजणी करावी, मंदिर ‎समितीच्या जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा येत असेल‎ तर शिवभक्त तो स्वतःहून काढून घेतील, अशी तयारी ‎शिवभक्तांनी दर्शवली असली तरी आधी अनधिकृतपणे ‎उभारण्यात आलेला पुतळा हटवा, मगच मोजणी करा,‎ असा पवित्रा मंदिर समितीने घेतल्याने दोन गटांतील वाद‎ चालूच राहिला आहे. अंजनगाव खे. येथे दुसऱ्या दिवशीही‎ तणावपूर्ण वातावरण होते. पोलिस प्रशासनाने‎ शिवरायांचा पुतळा न हटवल्याने गुरुवारी सकाळी खेलोबा‎ मंदिराचे मानकरी फरांडे महाराज यांच्यासह परिसरातील‎ समाज बांधव आक्रमक पवित्रा घेत मंदिराच्या आवारात‎ ठिय्या मारुन बसले. यावर पोलिस अधीक्षक अतुल‎कु लकर्णी यांनी मोजणी करून हा पुतळा मंदिराच्या जागेत‎येत असेल तर शिवभक्तांनी तो काढून घेण्याचे आवाहन‎ केले. यास शिवभक्तांनी होकार दिला, परंतू जोपर्यंत पुतळा‎ हटवला जात नाही. तोपर्यंत मंदिराची मोजणी न करण्याचा‎ निर्णय मंदिर समितीने घेतल्याने तोडगा निघाला नाही.‎

छत्रपती शिवरायांचा ‎पुतळा मंदिर प्रवेशद्वारात‎ खेलोबा देवा प्रमाणेच आम्ही‎ छत्रपती शिवाजी महाराज‎ आमचे कुलदैवत मानतो. परंतु ‎ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा‎ उभा केला आहे, ती जागा ‎मंदिराच्या प्रवेशद्वारावर येत ‎असल्याने धार्मिक विधी‎ करण्यास अडथळा निर्माण ‎होणार आहे. संबंधितांनी इतर ‎ठिकाणी महाराजांचा पुतळा‎ उभा करावा, आम्ही त्यास मदत‎ करू. राजाभाऊ वाघमोडे महाराज, ‎मुख्य मानकरी‎ हाकेंना चुकीची माहिती, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न‎ अंजनगाव खे. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी‎ लक्ष्मण हाकेंना माझ्याबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे. गैर‎समजुतीमुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत. चर्चा करून हा प्रश्न मार्गी‎ लावण्याचा प्रयत्न करणार आहे.‎ अभिजीत पाटील, आमदार.‎ आमदार अभिजीत पाटलांमुळे पुतळा हलवला नाही‎ पुतळ्याच्या माध्यमातून कधी ‎वंजारी, कधी दलित आता धनगर‎ समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न ‎होतोय. यामागील हेतूची मुख्यमंत्री ‎फडणवीस यांनी चौकशी करावी. ‎बुधवारी जिल्हा प्रशासनाने पुतळा‎ स्थलांतरित करण्याचे ठरवले होते.‎ परंतुआमदार अभिजीत पाटील ‎यांच्यामुळे पुतळ्याचे स्थलांतर‎ रोखले. गृह विभागाच्या कार्यपद्धती ‎प्रश्नांकित आहे.‎ लक्ष्मण हाके, ओबीसी नेते‎ पुतळा मंदिर जागेत असल्यास काढा- पोलिस अधीक्षक‎ पोलिस अधीक्षक अतुल‎ कुलकर्णी यांनी शिवभक्तांना पुतळा ‎इतर जागेवर स्थलांतरित करण्याचे‎ आवाहन करताना‎ मंदिराच्या जागेत पुतळा येत असेल ‎तर स्वःतहून पुतळा काढून घेण्याचे‎ आवाहन शिवभक्तांना केले.‎ शिवभक्तांनी ज्या जागेवर पुतळा ‎उभा आहे, ती जागा आणि‎ मंदिराच्या जागेचा गट नंबर वेगळा‎ आहे. मंदिराच्या जागेत पुतळा‎ असल्यास तो स्वतःहून काढून ‎घेण्याची तयारी आहे. नसल्यास‎ संबंधितांनी न्यायालयात जावे.‎ मोजणीसाठी गेलेल्या 10 कर्मचाऱ्यांना पाठवले परत‎ माढा भूमी अभिलेख कार्यालयातील 4 माळशिरस 3 व उत्तर सोलापूर‎ येथील 3 असे 10 कर्मचारी मंदिराची मोजणी करण्यास गेले असता मंदिर ‎समितीच्या लोकांनी आदेश दाखविण्याबरोबरच नोटीस न देता कशी काय‎ मोजणी करता असे सांगत कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले.‎ दगडफेकीच्या घटनेनंतर‎पोलिस बंदोबस्तात वाढ‎ ग्रामपंचायतीकडे तीन आठवड्यापूर्वी केला होता अर्ज‎ तीन आठवड्यापूर्वी दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ यांनी‎ अंजनगाव खे ग्रामपंचायतीकडे पुतळा उभा करण्यासाठी अर्ज केला होता.‎ ग्रामपंचायत प्रशासनाने रितसर परवानगी घेऊन पुतळा उभारण्याचे सांगत अर्ज‎ स्वीकारण्यास नकार दिला. पोलिस प्रशासनास माहिती कळल्यानंतर पोलिसांनी ‎तिघांना नोटिस बजावली होती, असे साहा.पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp