
अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी विकोपाला गेला. माजी आमदार राजन पाटील यांनी दोन गटाची अनगर येथे बैठक घेऊन शिष्टाईचा प्रयत्न केला. परंतु मोजणी ठरल्यानंतर, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोलिसांसमोरच कॉलर पकडल्याने नवा वाद पेटला. महसूल प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन किलोमीटर परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू केले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. सलग तिस-या दिवशी गावात पोलिसांचा डेरा कायम आहे. तोडग्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह इतरांची मोहोळ येथे उशीरापर्यंत बैठक सुरु होती. गेल्या दोन दिवसांपासून अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून दोन गटांतील तणाव मिटवण्यासाठी शुक्रवारी दुपारी माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर येथे बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जागा मोजणीस दोन्ही गटांनी मान्यता दिली. परंतु जागा मोजणीला गेलेल्या अधिकाऱ्यांशी कॉलर पकडून हाके यांनी हमरीतुमरी केली. यामुळे वातावरण आणखीच चिघळले असून यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली. अंजनगाव | येथे पुतळ्याच्या जागेवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी विकोपाला गेला. दोन किलोमीटर परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू केले आहे. 815 दोन दिवसांपासून रस्ता रोखून धरल्याने सोलापूरकडे जाणारी वाहतूक शेटफळ मार्गे वळवली. आ.अभिजीत पाटील दोन दिवसांपासून अंजनगांवमध्ये ठाण मांडून बसले असून अद्यापपर्यंत यावर तोडगा निघू शकलेला नाही.जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आवाहनानंतर पुतळा मंदिराच्या जागेत येत असल्यास तो काढून घेण्याचे तर तो पुतळा मंदिराच्या जागेत येत नसल्यास आहे, त्या ठिकाणी ठेवण्याबाबत दोन्ही गटाकडून मान्यता देण्यात आली. परंतू हाके यांनी मोजणी अधिकाऱ्यांना हुसकावून लावल्याने वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा मंदिराच्या जागेत येत असल्याने मंदिर समितीच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सदरील जागेची मोजणी केल्यानंतर पुतळा मंदिराच्या जागेत आल्यास तो स्वतःहून काढून घेण्याची लेखी हमी पोलिसांनी घेतली. या पत्रावर दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण, गजानन कृपाळ यांच्यासह नाईक मोहिते यांच्या सह्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.




