
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. पैसे आणि नोकरीचे आमिष दाखवूनच हे धर्मांतर करण्यात आले आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलांचेही धर्मांतर करून घेतले. मुलींना गोमांस खाऊ घातले, रोजे करायला लावल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले..मुंबईचेदेखील काही वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी बारकाईने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी आयटी कंपनीची एचआर हेड अश्विनी चेनानीला १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पाच संशयित आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शफी शेखची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. गुन्ह्यातील संशयित दानिश न्यायालयीन कोठडीत आहे. नाशिक येथील विश्रामगृहावर शुक्रवारी (दि. १०) बोलताना मंत्री महाजन यांनी या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त केला. त्याचा अत्यंत कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे. तशा सूचनाही त्यांना दिल्या आहेत. कुठलाही दोषी सुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच नाशिकमध्ये अशा कंपन्यांत अजून कुठे काही घटना घडल्या आहेत का, याबाबत देखील चौकशी सुरू आहे. कंपन्यांमधील विशाखा समित्या सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पीडितांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन करताना महाजन यांनी संबंधितांची ओळख गोपनीय ठेवण्याचेही आश्वासन दिले. सिंहस्थाची कामे अडविल्यास कारवाई होणारच कुंभमेळ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये, असे निर्देश देण्यात आले. कोणीही कामात अडथळा आणत असल्यास पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले असून मग तो कोणत्याही पक्षाचा असो, त्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मंत्री महाजन यांनी दिला. मोठ्या रॅकेटचा संशय यात मोठे रॅकेट असावे. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. कुठलाही दोषी सुटणार नाही, याची काळजी घेतली आहे. तसेच नाशिकमध्ये अशा कंपन्यांत अजून कुठे काही घटना घडल्या आहेत का, याबाबत चौकशी सुरू आहे. विशाखा समित्या सक्रिय आहेत. पीडितांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे, असेही महाजन यावेळी म्हणाले.
त्या नराधमांनी माझं ऑफिस नरक केलं : पीडित युवती ‘ज्या ठिकाणी मी माझे भविष्य घडवायला गेले होते, त्याच ऑफिसच्या भिंती माझ्या जिवावर उठतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. ते फक्त माझे सहकारी नव्हते, तर कॉर्पोरेट लांडगे होते’, अशा शब्दांत नाशिकच्या आयटी कंपनीत लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या सुशिक्षित तरुणीने तिच्यावर ओढवलेली आपबिती ‘दिव्य मराठी’कडे कथन केली. प्रोगाम असोसिएट पदावर काम करणारी ही तरुणी म्हणाली, हळूहळू शफी शेख आणि त्याच्या साथीदारांचा खरा चेहरा समोर आला. कामात मदतीचा बहाणा करून तो जवळ यायचा. पायाला पाय घासण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला वाटलं चुकून लागला असेल. मात्र हे नेहमीच सुरू झालं. एके दिवशी त्याने मर्यादा ओलांडली. माझ्या शरीराला स्पर्श करत त्याने अत्यंत घाणेरडा प्रश्न विचारला. माझे हात-पाय थरथरत होते, पण ओरडायची भीती वाटत होती. मी घाबरल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो निघून गेला. हे नराधम केवळ शरीरावरच नाही, तर श्रद्धेवरही वार करत होते. त्यांनी माझ्या धर्माचा, माझ्या आराध्य दैवतांचा अपमान केला. पौराणिक ग्रंथांमधील संदर्भांचा विकृत अर्थ लावून ते माझ्यासमोरच अश्लील कॉमेंट करत होते. माझे संस्कार पायदळी तुडवत होते. “तुला तुझ्या देवतांबद्दल काहीच माहिती नाही का?” असा प्रश्न विचारून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होते. मला नंतर कळलं की, या ऑफिसमध्ये मी पहिली नाहीये; तिथे काम करणाऱ्या इतर मुलींनाही या नरकातून जावं लागतंय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






