
- Marathi News
- National
- Coimbatore: The Question Is Whether The NDA Stronghold Will Remain Or Be Disintegrated.
अजय प्रकाश5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
निवडणुकीच्या रणधुमाळीत तामिळनाडूचे कोइम्बतूर आता केवळ दक्षिण भारताचे ‘मँचेस्टर’ किंवा उद्योगांचे केंद्र उरले नसून, राजकारणाचे असे कुरुक्षेत्र बनले आहे जिथे १० विधानसभा जागांवर सत्ता व बदलाचे भविष्य अवलंबून आहे.
एकीकडे येथील नारळ उद्योग वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपयांची उलाढाल करून हजारो घरांची चूल पेटवत आहे, तर दुसरीकडे वाल्पराईची चढण चढताच चहाचे मळे सुमारे ५००-८०० कोटी रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण करतात. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात द्रमुकची लाट असूनही, कोइम्बतूर जिल्ह्यातील सर्व १० जागांवर एनडीएचा ताबा राहिला, ज्यामध्ये ९ जागा अण्णाद्रमुक आणि एक जागा कोइम्बतूर दक्षिण भाजपच्या पदरात पडली होती.
फुटीचा अन्नामलाई फॅक्टर : या निवडणुकीतील सर्वात मोठे कोडे म्हणजे विरोधकांमधील फूट आहे. पुडूरमधील स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक चंद्रन यांच्या मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जागा मिळाल्या नसतील, पण त्यांच्या वाढत्या मतदान टक्क्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवी ऊर्जा भरली होती. तथापि, गेल्या काही वर्षांत के. अन्नामलाई यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणे आणि आता आमदारकी लढवण्यासाठी तिकीट न देणे अशा घटनांमुळे संघटनात्मक पातळीवर संभ्रम निर्माण आहे. भाजपचे सेल्वापुरम मंडल अध्यक्ष राजा चिदंबरम मान्य करतात की अन्नामलाई यांची मुख्य भूमिकेतील कमतरता कार्यकर्त्यांना निराश करणारी आहे, परंतु पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर त्यांचा विश्वास आहे. पक्षाचे जुने आधारस्तंभ करूमुत्तु त्यागराज यांचे असे मत आहे की सत्ताविरोधी लाटेमुळे कार्यकर्ते उत्साही आहेत.
अण्णाद्रमुकची प्रतिष्ठा अन् प्रादेशिक अस्मिता: शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर डेनिस यांच्यासारख्या विश्लेषकांचे असे मत आहे की अण्णाद्रमुक मधील एक गट भाजपसोबतची युती जोखमीची मानतो. त्यांचा तर्क आहे की भाजपसोबत राहिल्याने ना कट्टर हिंदू मते पूर्णपणे मिळू शकली, ना ती अल्पसंख्याक मते सुरक्षित राहिली जी एकेकाळी जयललिता यांच्या अण्णाद्रमुकची ताकद असायची. तसेच नीट, जीएसटी आणि पाण्याच्या खाजगीकरणासारख्या मुद्द्यांवर ई.पी.एस. पलानीस्वामी यांच्या जुन्या भूमिकेने त्यांच्या ‘कणखर नेता’ असण्याच्या प्रतिमेला काही प्रमाणात तडा गेला आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील बालमुर्गन म्हणतात की जनता आता द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या पारंपारिक द्विध्रुवीय लढतीपेक्षा वेगळा पर्याय शोधत आहे. २०२१ मध्ये कमल हासन यांच्या एम एन एम पक्षाची कामगिरी याच तळमळीचा भाग होती, जे आता द्रमुकसोबत गेले आहेत.
‘तिसरी शक्ती’ की मग मते खाणारा गट: २०२६ च्या समीकरणांवर सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या शक्ती आहेत- थलापती विजयचा टीव्हीके आणि सीमान यांचा एनटीके. चहा मळा कामगार नेते परमा शिवम यांचे असे मत आहे की सीमान यांची तामिळ राष्ट्रीयता आणि विजयची लोकप्रियता यांनी तरुणांमध्ये खोलवर शिरकाव केला आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकरण आकडेवारीच्या आधारे सांगतात की एनटीकेचा मतांचा हिस्सा २०२१ च्या ६% वरून वाढून २०२४ मध्ये ८% पेक्षा जास्त झाला आहे. कोइम्बतूरमध्ये हा आकडा ६% च्या वर आहे, जो कोणत्याही मोठ्या पक्षाचा खेळ बिघडवण्यासाठी पुरेसा आहे. सामाजिक कार्यकर्ते मालवरन यांच्या मते टीव्हीकेचा प्रभाव १८ ते २५ वयोगटातील तरुणांमध्ये सर्वाधिक आहे. त्यांचा एकूण मतांचा हिस्सा सध्या अनिश्चित असला तरी ते ‘गेमचेंजर’ ठरू शकतात.
युवा मनात बदलाची हाक: पोलाची जवळील नामाकल कोली पोलाई गावातील मनिदंडन जे यूपीएससीची तयारी करत आहेत. आमची पिढी आता ‘वृद्ध आणि भ्रष्ट’ चेहऱ्यांना कंटाळल्याचे ते म्हणतात.
एसआयआर: दुसऱ्या टप्प्यानंतर १२ राज्यांत ५.१८ कोटी नावे घटली
नवी दिल्ली| देशातील १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यानंतर मतदार यादीत १०.२% घट नोंदवली आहे. पूर्वी जिथे एकूण मतदार संख्या सुमारे ५०.९९ कोटी होती, ती आता घटून ४५.८१ कोटी झाली आहे. सर्वाधिक नावे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून हटवण्यात आली आहेत.
बंगाल : माजी शिक्षणमंत्री चटर्जी अन् सहकाऱ्यांवर ईडीचे छापे
कोलकाता| प. बंगालमध्ये निवडणुकीच्या धामधुमीत माजी शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी व त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. ही कारवाई भरती घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत केली जात आहे. एजन्सीने अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






