digital products downloads

Acharya Devvrat: का मागितली भिक्षा? कसं मिळालं आचार्य पद? शिक्षण किती? महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या माहिती नसलेल्या गोष्टी!

Acharya Devvrat: का मागितली भिक्षा? कसं मिळालं आचार्य पद? शिक्षण किती? महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या माहिती नसलेल्या गोष्टी!

Maharashtra Governor Acharya Devvrat:  नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून संस्कृतमधून शपथ घेतली. राजभवनात झालेल्या या सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. सीपी राधाकृष्ण उपराष्ट्रपती झाल्यानंतर महाराष्ट्रातील राज्यपाल पदाची जबाबदारी आचार्य देवव्रत यांनी स्वीकारली आहे. दरम्यान देवव्रत यांना आचार्य पदवी कशी मिळाली? त्यांनी कितवीपर्यंत शिक्षण घेतलं? त्यांना कोणते पुरस्कार मिळाले? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

कसे गेले  बालपण? 

डॉ. देवव्रत आचार्य यांचा जन्म 18 जानेवारी 1959 रोजी झाला. ते हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील समलखा तालुक्यातील पावचे रहिवाशी आहेत. लहरी सिंह कुटुंबातील देवव्रत ही एकूण 5 भावंडे आहेत. आचार्य देवव्रत यांच्यावर बालपणीपासून आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वतींच्या आदर्शांचा प्रभाव असल्याने त्यांचे जीवन शिक्षणाला वाहिले गेले. मूळचे रोहतकमधील असले तरी पावती गावात वाढलेले आचार्य यांचे आयुष्य संस्कृती आणि सामाजिक सेवेला समर्पित आहे.

किती झालं शिक्षण?

डॉ. आचार्य यांनी 1978 मध्ये दयानंद ब्रह्म विद्यालयातून विद्या वाचस्पती (स्नातकोत्तर समकक्ष) पदवी मिळवली. 1982 मध्ये हरिद्वारच्या दयानंद महाविद्यालय ज्वालापूरमधून बीए (विद्या भास्कर), 1984 मध्ये पंजाब विद्यापीठ चंदीगडमधून पदव्युत्तर, 1991 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून बी.एड. पदवी प्राप्त केली. नंतर 1996 मध्ये इतिहासात एमए, २००० मध्ये योग विज्ञानात डिप्लोमा आणि 2002 मध्ये निसर्गोपचार व योगिक विज्ञानात पीएच.डी. केली, ज्याने त्यांना शिक्षण क्षेत्रात नावलौकिक केले.

का मागितली भिक्षा? 

दहावी नंतर दयानंद आचार्य विश्वामित्र यांच्या मार्गदर्शनाने 1975 मध्ये दयानंद ब्रह्म महाविद्यालयात प्रवेशिका आणि विद्यारत्न अभ्यासक्रमात दाखल झाले. चार वर्षांत वेद, संस्कृत, हिंदी व इंग्रजीचा अभ्यास करून विद्या वाचस्पती पदवी मिळवली. त्या काळात 11 विद्यार्थ्यांच्या वर्गात प्राचार्य सत्यप्रिय यांचा प्रभाव पडला. यावेळी त्यांनी गुरुकुलसाठी घरोघरी भिक्षा मागण्याचा अनुभव घेतला, ज्यात त्यांनी शिक्षणाची जागृती केली. 2003 मध्ये यूएसएस उत्कृष्टता पुरस्कार मिळवला आणि 11 फेब्रुवारी रोजी हिसारच्या दयानंद ब्रह्म महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट पदवीधर म्हणून सन्मानित झाले.

आचार्यपद स्वीकारले

आर्य समाजाच्या शिक्षणविचारांचा प्रचार करणारे डॉ. देवव्रत आचार्य यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक मिळाली. ही बातमी कळताच, कुटुंबीयांसह हजारो समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली. 66 वर्षीय आचार्य यांनी 1981 मध्ये कुरुक्षेत्र गुरुकुलमध्ये आचार्यपद स्वीकारले आणि 34 वर्षांत त्या संस्थेला शिखरावर नेले.

कसे राहिले सेवाकार्य?

1981 पासून कुरुक्षेत्र गुरुकुलचे आचार्य असलेले डॉ. आचार्य यांनी शिक्षण, आरोग्य व औषध मोहिमांमध्ये दीर्घकाळ सहभाग नोंदवला. गोसेवा, नैसर्गिक शेती आणि संस्कृतीसाठी समर्पित जीवन जगतात. गुजरात विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही कार्यरत राहिले. त्यांच्या प्रयत्नाने गुजरातमधील हलोल येथे देशातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ स्थापन झाले.

राज्यपाल म्हणून नेमणूक 

आचार्य देवव्रत यांना 2015 ऑगस्टमध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणूक मिळाली, जे त्यांचे पहिले राज्यपालपद होते. नंतर गुजरातची जबाबदारी सांभाळली. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठीही नाव चर्चेत होते. पण सीपी राधाकृष्ण यांना ती जबाबदारी मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी आचार्य देवव्रत यांच्याकडे गेली. त्यांचा प्रवास गुरुकुलप्रमुख ते राज्यपाल असा प्रवास आर्य समाजाच्या आदर्शांवर आधारित आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp