
Ajit Pawar Video Call to deputy SP Anjali Krishna : उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच त्यांच्या परखड विधानामुळे चर्चेत असतात. ते काम न करणाऱ्यांना अजित पवार चांगलेच खडेबोले सुनावत असताना आपण पाहिलं आहे. अशातच अजित पवार यांच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला त्यानंतर जे घडलं त्यानंतर अजित पवार संतापले. नेमकं काय झालं पाहूयात.
पोलीस उपअधीक्षकांना व्हिडीओ कॉल, पण ओळखलेच नाही अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडली. नेमकं झालं असं की कुर्डू गावात रस्त्यासाठी बेकायदेशीर मुरूमाचे खोदकाम केल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आयपीएस अंजली कृष्णा त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्यात. पण या कारवाईदरम्यान अंजली कृष्णा यांचा गावकऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला.
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025
त्यानंतर जगताप तो फोन अंजली कृष्णा यांना बोलण्यासाठी तो फोन दिला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, तुमच्यात एवढी हिंमत आहे का? या फोनवर अजित पवार स्वत:ला मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहे, हे सांगत होते. त्वरित कारवाई थांबवण्याचे आदेश देत होते. मात्र अंजली कृष्णा यांनी त्यांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा असं म्हटलं. त्यानंतर अजित पवार संतापले आणि म्हणालेत, ‘तुझी इतकी डेरिंग आहे… तू माझा चेहरा ओळखशील ना… मला तुझा नंबर दे, मी तुला थेट व्हिडिओ कॉल करेन’. एवढंच नाही अजित पवार यांनी लगेचच अंजली यांना व्हिडीओ कॉल केला. दरम्यान हा संपूर्ण घटना तीन तास चालू होता. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये अंजली कृष्णा जमिनीवर बसून अजित पवारांशी बोलताना दिसत आहे. तसंच त्यानंतर अजित पवार यांनी तहसीलदारांना फोन करून कारवाई थांबवण्याचे निर्देशही दिल्याची माहिती समोर आली आहे.
FAQ
1. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात नेमकी काय घटना घडली?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी बेकायदेशीर मुरूम खोदकामाची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या. कारवाईदरम्यान गावकऱ्यांशी त्यांचा वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला.
2. अजित पवार आणि अंजली कृष्णा यांच्यात काय संवाद झाला?
बाबा जगताप यांनी अजित पवार यांचा फोन अंजली कृष्णा यांना बोलण्यासाठी दिला. अजित पवार यांनी स्वतःची ओळख देत “मी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहे” असे सांगून कारवाई तातडीने थांबवण्याचे आदेश दिले. मात्र, अंजली कृष्णा यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही आणि त्यांना वैयक्तिक नंबरवर कॉल करण्यास सांगितले. यावर अजित पवार संतापले आणि म्हणाले, “तुझी इतकी डेरिंग आहे… तू माझा चेहरा ओळखशील ना… मला तुझा नंबर दे, मी तुला थेट व्हिडीओ कॉल करेन.”
3. अजित पवार यांनी पुढे काय केले?
अजित पवार यांनी तात्काळ अंजली कृष्णा यांना व्हिडीओ कॉल केला आणि कारवाई थांबवण्याचे निर्देश दिले. तसेच, त्यांनी तहसीलदारांना फोन करूनही कारवाई थांबवण्यास सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.