
Marathwada Flood Ajit Pawar Beed Visit : मराठवाड्याला अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असतानाच आता नेतेमंजळी या प्रभावित जिल्ह्यांच्या दौऱ्यावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आणि एकंदर परिस्थिती समजून घेण्यासाठी पोहोचलेल्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही नावाचा समावेश होत आहे. अजित पवार दोन दिवसांपासून या दौऱ्यावर असून, गुरुवारी त्यांच्यासमोर बीड दौऱ्यादरम्यान एका महिलेनं हंबरडा फोडला आणि तिची व्यथा पाहून उपमुख्यमंत्र्यांनी तिथं आलेल्या इतर शेतकरी अन् बांधवांना महत्त्वाचं आवाहन केलं.
महत्त्वाचं आवाहन करत काय म्हणाले अजित पवार?
बीडच्या हिंगणी खुर्द गावातील एका महिलेने अजित पवारांसमोर हंबरडा फोडत माझ्या मोबाईल वरून कोणीतरी पैसे काढून घेतल्याची व्यथा मांडली. ‘मोबाईल मुलाकडे होता मला मालकही नाहीत माझा मुलगाही मयत झालाय. मला मदत करा….’ अशी मागणी त्या महिलेने उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तर, ‘मावशी काळजी करू नका…’ असं म्हणत पवारांनी पीडित महिलेला धीर देण्यचा प्रयत्न केला.
महिलेनं मांडलेली व्यथा पाहून तिथं सोबत आलेल्या अधिकाऱ्यांना निर्देश देत पुढील मदतीसाठी पावलं उचलण्याच्या सूचना त्यांनी तातडीनं दिल्या. याचदरम्यान आपल्या परिनं त्यांनी या प्रकरणात तर्क लावत, ‘बहुतेक मुलगा आईचे पैसे हरल्याला दिसतोय. तरी आम्ही त्याची सायबर क्राईम म्हणून नोंद घेत आहोत. माझं आई-वडिलांना सांगणं आहे आपल्या मुलाकडे मुलीकडे लक्ष द्या. असं करू नका बाबांनो एक एक पै-पै महत्त्वाची असते’, अशा शब्दांत त्यांनी आवाहन केलं.
‘दादा दीड हजार रुपये महिन्याला मिळायचे ते देखील पैसे मी त्याच खात्यात टाकायची’, असं त्या पीडित महिलेनं सांगितलं असता त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया देत महिलेला मदतीचं आश्वासन दिलं.
Ajit pawar Video | मोबाईल वरून माझी फसवणूक झाली महिलेने हंबरडा फोडत मांडली अजित पवारांकडे व्यथा #ajitpawar #zee24taas #marathinews pic.twitter.com/c0LPTYD64G
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 25, 2025
जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून झापलं
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या दौऱ्यादरम्यान थेट जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून झापलं. ‘तात्काळ तलाव दुरुस्त करा इथे काहीही राहिले नाही, शेतकऱ्यांच्या बांधावरून अजित पवारांचा जलसंपदा अधिकाऱ्यांना फोन कारण सांगत बसू नका काम करा जे काय असेल ते स्पॉटवर येऊन पाहा. मी या ठिकाणी स्पॉटवर आहे. तुम्हीही स्पॉटवर येऊन याची एकदा पाहणी करा आणि तात्काळ तलाव दुरुस्त करा’, असं म्हणत या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सहकार्य करा अशा कडक शब्दांत सूचना वजा इशारा अजित पवारांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना दिला.
FAQ
अजित पवार बीड दौऱ्यावर कशासाठी गेले होते?
मराठवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून प्रभावित जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.
हिंगणी खुर्द गावात एका महिलेची कोणती व्यथा मांडली गेली?
बीडच्या हिंगणी खुर्द गावातील एका महिलेनं अजित पवारांसमोर हंबरडा फोडत सांगितले की, तिच्या मोबाईलवरून कोणीतरी पैसे काढून घेतले. तिने सांगितले, “मोबाईल मुलाकडे होता, मला मालकही नाही, माझा मुलगाही मयत झालाय. मला मदत करा.”
अजित पवारांनी महिलेच्या व्यथेवर काय प्रतिक्रिया दिली?
अजित पवारांनी महिलेला “मावशी काळजी करू नका…” असे म्हणत धीर दिला. त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सायबर क्राईम म्हणून तक्रार नोंदवण्याचे आणि मदत करण्याचे निर्देश दिले. तिच्या पेन्शनबाबत “पैसे मिळून जातील” असे आश्वासनही दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.