
Praful Patel on Ajit Pawar Last Call : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झालं. खासगी विमानाने अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. बारामतीत विमानाच्या लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली जाण्याने कार्यकर्ते आणि पवार कुटुंबावर मोठा आघात झाला.
बारामतीला निघण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदल्या रात्री मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांच्याशी फोनवर संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, ‘प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही, मी काही दिवस बाहेर जातोय’, असा शेवटचा संवाद प्रफुल्ल पेटल यांच्याशी झाला होता.
(हे पण वाचा – Ajit Pawar Funeral Photos: ‘दादा गेला’ अन् बहिणच झाली आधारवड…; मन सुन्न करणारे फोटो)
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमानाने दोन वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिसऱ्यावेळी लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला. अजित पवारांचं असं निधन झालं यावर विश्वास बसत नाही. आम्ही सगळेच दिल्लीत होतो. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे आणि मी आम्ही सगळेच दिल्लीत होतो. पण ही घटना घडल्याची माबिती मिळताच आम्ही बारामतीला दाखल झालो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाराष्ट्रसाठी न भरुन येणार नुकसान झालं आहे. या घटनेवर अजूनही विश्वास बसत नसल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले की, आमचं जे बोलणं होतं ते झालं आणि पुढे अजित दादा म्हणाले की, आता आपलं भेटणं होणार नाही. मी दहा ते पंधरा दिवस कामासाठी बाहेर आहे. आणि अगदी तसंच झालं अजित पवारांशी तो संवाद अखेरचा ठरला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



