digital products downloads

Ajit Pawar Death: Plane Crash बद्दल पवार कुटुंब पहिल्यांदाच बोललं; ‘आमच्या मनात अनेक शंका, बॉम्बसारख्या…’

Ajit Pawar Death: Plane Crash बद्दल पवार कुटुंब पहिल्यांदाच बोललं; ‘आमच्या मनात अनेक शंका, बॉम्बसारख्या…’

Ajit Pawar Death Doubts About Flight Crash: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनासंदर्भात लवकरच शरद पवारांच्या कुटुंबाकडून जाहीर पत्रकार परिषद घेतली जाणार असल्याची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवारांनी दिली आहे. बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिलं. यामध्ये त्यांनी विमान अपघातासंदर्भात आमच्या मनातही काही शंका असल्याचं म्हटलं आहे. तसेच यासंदर्भात 10 तारखेला सविस्तरपणे पत्रकारांसमोर बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source

आम्ही भावनिक जे वाटेल ते बोलू शकतो

रोहित पवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा काय अधिकार? असा प्रश्न विचारणाऱ्या सुनील तटकरेंना रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. “मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल मात्र मला भावनिक अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकतो. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यावर मी बोलणार आहे. काही राजकीय लोक सगळे जवळचे असतात असं नाही आम्ही भावनिक आहोत. विना राजकारणात आम्ही भावनिक जे वाटेल ते बोलू शकतो,” असं रोहित पवार म्हणाले आहेत. 

आमच्या मनामध्ये काही प्रश्न

अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल बोलताना, “सगळ्यांच्या मनात शंका आहे. आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. का घडलं? कसं घडलं असावं याबाबत दहा तारखेला प्रश्न उपस्थित करणार,” असं रोहित पवार म्हणाले. 

मी सीसीटीव्ही पासून…

अमोल मिटकरींसंदर्भातही रोहित पवारांना प्रश्न विचारण्यात आला.  “अमोल मिटकरी हे दादाचा जवळचा कार्यकर्ता होता. काही गोष्टी योग्य पद्धतीने मांडत आहेत. काही विषयाच्या बाबतीत ते भावनिक आहेत. भावनेच्याभरात अनेक प्रश्न लोकांना पडलेले आहेत. मी सीसीटीव्ही पासून सर्व गोष्टी वर प्रेझेंटेशनमध्ये भाष्य करेल,” असं रोहित पवार म्हणाले.

विमानात बॉम्ब?

बजरंग सोनवणेंनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब असल्याची शंका बोलून दाखवली आहे. यावर बोलताना रोहित पवारांनी बजरंग सोनावणेंच्या शंकेला वाव असल्याचं म्हटलं आहे. “आमच्या मनात अनेक शंका आहेत. बॉम्बसारख्या काही गोष्टी असू शकतात. 10 तारखेला आमच्या मनातल्या शंका आहेत त्याबाबत मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे,” असं रोहित पवार म्हणाले. 

परिवार म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे

अजित पवारांच्या निधानंतर पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळत असल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता रोहित पवारांनी, “दादांची मनापासूनची इच्छा होती परिवार म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याच पद्धतीने आज सर्व एकत्र आले. दादांकडूनही प्रयत्न केले गेले होते. आम्ही त्याच पद्धतीने प्रयत्न करत राहू. परिवार अजूनही एकत्र आहेत. दादांचा स्वप्न आहे परिवार म्हणून आपण एकत्र राहू आणि तसंच काही होईल,” असा विश्वास व्यक्त केला. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp