
Ajit Pawar on Manikrao Kokate Resignation: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडीओनंतर विरोधक राजीनाम्याची सतत मागणी करत असून, विरोधक आक्रमक झाले आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. सोमवारी मी त्यांना भेटणार असून, त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
“मला जी माहिती मिळाली त्यानुसार, सभागृहात आत हे घडलं आहे. विधीमंडळाचा परिसर राम शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या अख्त्यारित येतो. त्यांनी चौकशी सुरु केल्याची माझी माहिती आहे. माझी आणि त्यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही. खेळत नव्हतो असं त्यांचं म्हणणं आहे. सोमवारी किंवा मंगळवारी माझी त्यांच्याशी भेट हाईल,” असं त्यांनी सांगितलं आहे.
“मला जी माहिती मिळाली त्यानुसार, सभागृहात आत हे घडलं आहे. विधीमंडळाचा परिसर राम शिंदे आणि राहुल नार्वेकर यांच्या अख्त्यारित येतो. त्यांनी चौकशी सुरु केल्याची माझी माहिती आहे. माझी आणि त्यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही. खेळत नव्हतो असं त्यांचं म्हणणं आहे. सोमवारी किंवा मंगळवारी माझी त्यांच्याशी भेट हाईल,” असं त्यांनी सांगितलं आहे.
“देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांना सांगितलं होतं. इतर वरिष्ठांशीही चर्चा केली. प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे याचं भान ठेवून वागलं, बोललं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. आम्ही तिघांनी आपापल्या पक्षातील नेत्यांना अशा सूचना दिल्या आहेत. मागेही त्यांच्याकडून असं काही घडलं होतं त्याची दखल घेतली होती. असं होता कामा नये असं सांगितलं होतं. दुसऱ्यांदा घडलं तेव्हाही जाणीव करुन दिली. पण आता याबाबतीत मी करतच नव्हतो असं म्हणत आहे. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्याशी चर्चा करुन नक्की काय झालं हे निष्पन्न होईल,” असंही ते म्हणाले आहेत.
“सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. इतर काय म्हणतात याच्याशी काही देणंघेणं नाही. आमच्या कुठल्यामही मंत्री, नेत्यांकडून महायुतीला कमीपणा येईल अशा प्रकारचं वक्तव्य होता कामा नये,” असा सल्लाही त्यांनी दिला.
“शेवटी हे तीन पक्षाचं सरकार आहे. तिघेजण चर्चा करुन निर्णय होता. सहसा काही घडलं तर प्रत्येक पक्षाप्रमाणे जबाबदारी असतात. राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय घेऊ शकतात,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवारांनी राजीनामा घेतला नाही, तर सगळा व्हिडीओ बाहेर काढेन असं आव्हान दिल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, “विरोधकांचं हे कामच आहे. व्हिडीओ आहेत, पेनड्राईव्ह आहेत हे दम द्यायचं बंद करा. एकदा सगळं बाहेरच येऊ द्या. नुसतं बोलायचं आणि बातम्या करायच्या. काय माहिती आहे ते कळू दे. कुणाला हनी ट्रॅपची काय माहिती हे सगळं बाहेर येऊ द्या. आपल्यालाही कोण कसं वागलं हे समजेल. मागच्या आणि त्याआधीच्या सरकारच्या काळातही हे बोललं जात होतं. प्रत्येकजण पेन ड्राईव्ह दाखवत असतं. लोकांनाही कळू द्या, सत्य समोर येईल. सर्वजण संशयाच्या भोऱ्यात राहतात. त्याच्यात चार मंत्री, आयपीएस अधिकारी, राजकीय लोक आहेत. पण राजकीय म्हटलं की सगळेच त्यात येतात. एकदा काय वस्तुत्थिसी समोर येऊ दे. पोलीस यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करेल. पुरावे असतील तर जरुर द्यावे, रितसर चौकशी केली जाईल”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.