
Pune Atharva Sudame Controversy : पुण्यातील लोकप्रिय सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर अर्थव सुदामेने गणेशोत्सव काळात एक रील शेअर केली. त्याच्या या रीलने नवीन वादाला तोंड फोडलंय. सोशल मीडियावर सुदामेवर होणाऱ्या टीकेच्या भडीमारामुळे त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन डिलीट केला आहे. अर्थवच्या व्हिडीओ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. अर्थव ज्या प्रकारचे रिल्स बनवतो, ज्यामुळे पुण्याचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. पुण्याचे नाव जगभरात नेणाऱ्या अर्थवला त्याचा त्या रीलमुळे धमकी येत आहे. तरदुसरीकडे लोकांना अर्थवची एक संपत्ती किती आहे, हे जाणून घ्यायचं आहे. (Youtuber Atharva Sundame Netwoth How much earn in a year Pune Reel Controversy)
अथर्व सुदामे वर्षाला किती कमवतो?
आपल्या अनोख्या शैलीने आणि आसपासच्या घटनांवर आधारित तो मार्मिकपणे भाष्य करणारे रील बनवतो. त्याचे हे रील तरुणाईसह सर्व वयोगटांमधील लोकांना आवडतात. एवढंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा त्याचे फॅन आहे, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
अर्थवने 2015 पासून व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. अथर्वचे इन्स्टाग्रामवर 1,726,744 फॉलोअर्स आहेत. एवढंच नाही तर त्याची प्रसिद्धीचा अवाका पाहत अनेक चित्रपटांच्या डिजीटल प्रमोशनसाठी अथर्वबरोबत त्याच्या रिलमध्ये काम करताना तुम्ही पाहिलं असेल. अथर्वची सोशल मीडियावरील यशस्वी कामगिरी पाहून अर्थव सुदामे किती कमावतो असा प्रश्न लोकांना कायम पडतो.
तर आम्ही तुम्हाला सांगतो, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि टिकटॉक यावरी फॉलोअर्सची संख्या यावर त्याचा कमाईचा आकडा एका हाफी या साइडने अंदाजे सांगितला आहे. ते सांगतात की, अर्थव वर्षाला $261,440 – 358,200 म्हणजे भारतीय चलनानुसार 22883231- 31352407 रुपये तो कमवतो. याचा अर्थ तो कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक आहे. या साइ़डच्या अंदाजाने तो दर महिन्याला अधिक अधिक पैसे कमवत असा एक आलेख त्यांनी मांडला आहे.
अर्थव सुदामे वाद काय?
अर्थव सुदामेने शेअर केलेल्या व्हिडीओत तो गणपतीची मूर्ती घ्यायला जातो, यावेळी त्याला मूर्तीकार मुस्लिम असल्याचे कळते. यावेळी तो मूर्तीकार तुम्हाला दुसरीकडून मूर्ती घ्यायची असेल तर घ्या असं सांगतो. सुदामे याने त्याच मूर्तीकाराकडून मूर्ती घेतल्याचे दाखवले आहे. या व्हिडीओमुळे वाद सुरू झाला आहे. नेटकऱ्यांनी केलेल्या ट्रोलिंगनंतर सुदामे याने व्हिडीओ डिलिट केला. दरम्यान, आता अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.