
August 2025 School Holidays Calender : 15 जूनपासून शाळा सुरु झाल्या आहेत. मुलं मोठ्या उत्साहाने शाळेत जात आहे. पण शाळेला सुट्टी म्हटली की, त्यांच्या आनंदाला पारा नसतो. श्रावण महिन्याचा सुरुवात झाली असून अनेक सणांमुळे आता मुलांना शाळेला सुट्टी मिळणार आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑगस्टमध्ये अनेक सण असल्याने मुलांमध्ये उत्साह आहेत. शिवाय आजकाल दोन्ही पालक नोकरीवर असतात त्यामुळे मुलांची शाळा आणि नोकरी यांची रोज कसरत असते. अशात मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यास त्यांना जरा धीर मिळतो. आयांना मुलांच्या डब्यांपासून सुट्टी मिळते. तर वडिलांना सकाळी उठून त्यांना शाळेत सोडायला जावं लागत नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुलांच्या शाळेला किती दिवस सुट्ट्या असणार आहे, याची नोंद करुन घ्या. ही यादी पाहून तुम्हाला ऑगस्ट महिन्यातील दिवसांचे नियोजन करता येईल. (August School Holidays in maharashtra Holidays Calender in marathi)
ऑगस्ट महिन्यात आपले लाडके बाप्पा येणार आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्यांची तयारी करत असाल तर किती दिवस मुलांच्या शाळेची सुट्टी घेऊन रेल्वेचे तिकीट काढा.
ऑगस्ट 2025 किती दिवस शाळेला सुट्टी?
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुलांना शाळेसाठी 18 दिवस सुट्ट्या आहेत. गणेशोत्सवाची मुंबई आणि कोकणात विशेष उत्साह दिसून येतो. त्यामुळे याठिकाणी मुलांना शाळेत गणेशोत्सवासाठी सुरुवातीचे पाच दिवस सुट्ट्या असतात. पण यंदा मुलांची मजा आहे. कारण त्यांच्या लाडक्या बाप्पासोबत त्यांना दोन दिवस अधिक मजा करता येणार आहे. कारण यंदा मुंबईसह कोकणातील शाळेत यंदा गणेशोत्सवाची 7 दिवस सुट्टी मिळाली आहे. राज्यात इतर ठिकाणी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुलांना शाळेला सुट्टी असते.
9 ऑगस्ट 2025 – रक्षाबंधन – शनिवार
10 ऑगस्ट 2025 – रविवार
15 ऑगस्ट 2025 – स्वातंत्र्य दिन / पारशी नूतन वर्ष – शुक्रवार
16 ऑगस्ट 2025 – गोपाळकाला / दहीहंडी – शनिवार
17 ऑगस्ट 2025 – रविवार
23 ऑगस्ट 2025 – शनिवार
24 ऑगस्ट 2025 – रविवार
27 ऑगस्ट 2025 – गणेश चतुर्थी ते 2 सप्टेंबर 2025 (गणेशोत्सव सुट्टी)
5 सप्टेंबर 2025 – शिक्षक दिन
6 सप्टेंबर 2025 – अनंत चतुर्दशी
7 सप्टेंबर 2025 रविवार
वर्षभरात 128 दिवस शाळेला असणार सुट्टी
विद्यार्थ्यांना 52 रविवार वगळून वर्षभरात एकूण 76 सुट्ट्या असणार आहेत. त्यात दिवाळीच्या 10 दिवस आणि उन्हाळ्याच्या 38 दिवस सुट्ट्या असणार आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या दहा दिवस म्हणजेच 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. उन्हाळ्याच्या 38 दिवस सुट्ट्या 2 मे ते 13 जून 2026 पर्यंत या सुट्ट्या असणार आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.