
Pune Crime News Ayush Komkar Murder Case: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून या तपासादरम्यानच नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात 5 सप्टेंबर रोजी 19 वर्षीय आयुष कोमकरची हत्या करण्यात होती. या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आता या हत्येमध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी नसलेल्या कृष्णा आंदेकरने पडद्यामागून काय केलं हे समोर आलं आहे.
नेमकं घडलं काय?
19 वर्षीय आयुष उर्फ गोविंदा गणेश कोमकर (Ayush Komkar) याची पुण्यातील नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना गणेशी विसर्जनाच्या पूर्वसंध्येला (5 सप्टेंबर 2025) संध्याकाळी घडली. मारेकऱ्यांनी आयुषवर जवळपास एक डझन गोळ्या झाडल्या. आयुषचा जागीच मृत्यू झाला.
हत्येचं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या घडवून आणण्यात आली. मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकरांची हत्या झाली होती. वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आयुषचे वडील गणेश कोमकर आंदेकर टोळीचा शत्रू आहे. त्यामुळे आंदेकर टोळीने त्याचा मुलगा आयुषला लक्ष्य केले. आयुष हा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी होता आणि तो बंडू आंदेकरचा नातू होता.
पोलिसांनी काय कारवाई केली?
घटनेच्या दोन तासांत पोलिसांनी हत्येचा उलगडा केला. पुणे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वात तपास सुरू झाला. सुरुवातीला आठ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये जसे अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे यांचा समावेश होता. 13 आणि 14 सप्टेंबर रोजी पोलिसांनी गुजरात सीमेवर सुरत-उज्जैन-उदयपूर-द्वारका मार्गाने पळून गेलेल्या शिवम आंदेकरसह चौघांना अटक केली. एन्काउंटरच्या धमकीनंतर 16 सप्टेंबर रोजी फरार कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला.
मकोका आणि फडणवीसांचा इशारा
10 सप्टेंबरला बंडू आंदेकरसह 13 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावण्यात आला. 12 सप्टेंबरला यश पाटील आणि अमित पाटोळेंची कोठडी वाढवली. पोलिसांनी पिस्तूल, पुरावे जप्त केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी “चुकीला माफी नाही” असा इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणी डोकं वर काढलं तर त्याचं डोकं उडवू,” हे गँग वॉर नसून कठोर कारवाई असल्याचे सांगितले.
मारेकरी आणि टोळी कोणती? कोणी काय काम केलं?
आंदेकर टोळी पुण्यातील नाना पेठ परिसरातील गुंडांची टोळी आहे. टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय 70) असून, त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि साथीदारांचा यात सहभाग आहे. कृष्णा आंदेकर हा बंडूचा मुलगा असूनच तो आयुषवरील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे. अमन युसूफ पठाण (25) आणि यश सिद्धेश्वर पाटील (19) यांनी प्रत्यक्ष गोळीबार केला. अमित प्रकाश पाटोळेने (19) पाळत ठेवण्याचं काम केलं. तर आरोपींमध्ये तुषार नीलंजय वाडेकर (27), स्वराज नीलंजय वाडेकर (23), वृंदावनी नीलंजय वाडेकर (40), शिवम आंदेकर, शिवराज, अभिषेक, लक्ष्मी आंदेकर इ. एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींनी चौकशीत कबूल केले की, पिस्तूल कृष्णा आंदेकरने पुरवले. ते आयुषवर पाळत ठेवत होते आणि हल्ला पूर्वीचाच योजना होता.
आयुषच्या खुनात कृष्णा आंदेकरची भूमिका काय होती?
पुण्यातील आयुष कोमकरच्या खुनासाठी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनेच दिल्याची कबुली मारेकरी अमन पठाण व सुजल मेरगू यांनी पोलिसांसमोर दिली आहे. फरार असताना कृष्णा आंदेकरने पुरावे नष्ट केले का? कोणाशी संपर्क ठेवला होता? याचा तपास सुरू आहे. पोलीस तपासात कृष्णा हा कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख लिंक असल्याचा संशय आहे. स्वतःहून पोलिस ठाण्यात शरण आलेल्या कृष्णाला न्यायालयाने 18 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, सर्व आरोपी आता चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.