digital products downloads

Beed Crime : परळीत आज बंदची हाक! सहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानंतर संतापाची लाट, आईला झोप लागली अन्…

Beed Crime : परळीत आज बंदची हाक! सहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानंतर संतापाची लाट, आईला झोप लागली अन्…

Beed Crime : बीडमधील परळी रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी नराधमाला काही तासांमध्येत अटक केली आहे. पण या घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय संघटना आणि नागरिकांकडूनच परळी बंदची हाक देण्यात आलीय. 31 ऑगस्ट रोजी आई-वडिलांसोबत आलेल्या सहा वर्षाच्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत त्याला आठ तासातच अटक केली.  (Beed Crime Parli bandh 6 year old child molested in parli railway station maharashtra news in marathi)

Add Zee News as a Preferred Source

आता हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज दिवसभर परळीतील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळपासूनच परळी शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

नेमकं काय घडलं?

पंढरपूरमधील एक जोडप रोजगाराच्या शोधात बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी आले होते. रेल्वे प्रवास करुन ते जोडप आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीसह परळीत दाखल झाले. त्यानंतर वडील काही वेळासाठी स्टेशनच्या बाहेर काही कामासाठी गेले असताना चिमुकली आईसोबत रेल्वे स्थानक थांबली होती. पण आई आजारी असल्यामुळे तिला रेल्वे स्थानकावरच झोपली गेली. हीच संधी साधत नराधम व्यक्तीने चिमुकलीला एका जवळील ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

अत्याचारानंतर पीडित चिमुकली रडत रडत आईकडे परत आली. आईने विचारपूस केल्यानंतर चिमुलीने घडलेली सगळी आपबीती सांगितली. चिमुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतरर पीडित चिमुकलीला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे या चिमुकलीवर उपचार सुरु आहे. 

या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यात एक व्यक्ती पीडित मुलीला सोबत घेऊन जाताना दिसला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत परळी शहरातील बरकत नगर भागातील संशयित आरोपीला अटक केली. 

FAQ

1. परळी रेल्वे स्टेशनवर नेमकी काय घटना घडली?

पंढरपूर येथील एक दाम्पत्य रोजगाराच्या शोधात परळी येथे आले होते. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वे स्थानकावर त्यांच्यासोबत असलेल्या सहा वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. मुलीची आई आजारी असल्याने ती झोपली होती, तेव्हा ही घटना घडली.

2. ही घटना कशी समोर आली?

अत्याचारानंतर पीडित मुलगी रडत आपल्या आईकडे परत आली. आईने विचारपूस केल्यानंतर मुलीने सर्व घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने परळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

3. पोलिसांनी काय कारवाई केली?

पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयिताला ओळखले गेले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि संभाजीनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासांत परळीतील बरकत नगर भागातून आरोपीला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १ सप्टेंबर २०२५ रोजी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp