
Bhaskar Jadhav Emotional : कितीही मोठा राजकारणी असो किंवा उद्योगपती असो तो आपल्या कुटुंबियांसाठी हळवे असतात. त्यात लेक आणि वडिलांचं नातं तर खूप जिव्हाळा आणि भावूक असतं. कुटुंबातील कणखर हा माणूस लेकीच्या लग्नात हळवा होताना आपण कायम पाहिलं आहे. असाच काहीसा क्षण कणखर व्यक्तिमत्वाच्या भास्कर जाधव यांच्यासोबत झाला. लेकीची सासरी पाठवणी करताना भास्कर जाधव हे हळवे झाले. त्यांचं हे रुप पाहून ग्रामस्थही गहिरवले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते म्हणून भास्कर जाधव यांची ओळख आहे. पण आज त्यांची एक हळवी बाजू सगळ्यांनी पाहिली. गुहागर तालुक्यातील पांगारी या गावात भास्कर जाधव पत्नी, मुले, पुतणे, सुनांसह लग्नाला हजर होते. हे लग्न होतं घरकाम करणाऱ्या सु्प्रिया पाटील हिचं. सु्प्रिया पाटील गेल्या 8 वर्षांपासून भास्कर जाधव यांच्याकडे कामाला होती. सुप्रिया हिच्या मनमिळाऊ स्वभाव आणि प्रामाणिकपणामुळे तिने जाधव कुटुंबाला आपलं केलं होतं. जाधव कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी तिला आपलसं केलं होतं. भास्कर जाधव आणि त्यांच्या पत्नीने सुप्रियावर लेकीसारखी माया केली. त्यामुळे लेकीची सासरी पाठवणी करताना भास्कर जाधव यांचे डोळे पाणावले.
सासरी पाठवणी होत असताना लेक सु्प्रिया सुवर्णा जाधव आणि सून स्वरा जाधव यांना मिठी मारून रडली. आपुलकीचे हे नातं पाहून ग्रामस्थही हळवे झाले. रक्तापेक्षा जिव्हाळाचं नात्याची हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये भास्कर जाधल रुमालाने डोळे पुसताना दिसत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.