digital products downloads

Big News: मारिन ड्राईव्ह चौपाटी लोकांसाठी बंद; चौपाटीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Big News: मारिन ड्राईव्ह चौपाटी लोकांसाठी बंद; चौपाटीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Mumbai Rains: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. आता पुन्हा पावसानं जोर धरला आहे. पावासामुळे मारिन ड्राईव्ह चौपाटी लोकांसाठी बंद करण्यात आली आहे. चौपाटीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. 
मारिन ड्राईव्ह समुद्र चौपाटी लोकांसाठी बंद करण्यात आली आहे.  दुपारी साडेतीन नंतर हाय टाईड सुरू झाली आहे. पावसाचा जोर ही वाढला आहे.  त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी मारिन ड्राईव्ह समुद्र किनारी जी लोक येत आहेत त्यांना किनारपट्टी पासून पोलीस दूर करत आहेत. 

मुसळधार पावासामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. तुफान पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीय.. मुंबईत रात्रीपासूनच पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली. बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर विलेपार्ले, अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड या सर्व परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

मुंबई आणि मुंबई उपनगरांसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आहे….मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा असं सांगण्यात येत आहे. 

राज्यात मान्सूनचे जोरदार कमबॅक झालंय.. राज्यभरात पावसाचा जोर वाढत असून आज कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय.. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची, उर्वरित विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सवधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp