
Raj Thackerays MNS BMC Election: मनसेच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी झी २४ तासच्या हाती लागलीय. प्रत्येक मतदार यादी तपासा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. मतदार यादीवर बारीक लक्ष ठेवा, घोटाळा टाळा असे निर्देशही राज ठाकरेंनी दिलेत. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिका-यांना निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेत.
राज ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसलीये. विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केल्यावर राज ठाकरे अधिकच सावध झालेत. विधानसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज ठाकरेंनी पक्षसंघटनेला आतापासूनच कामाला लावलंय. वांद्रेतल्या एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिका-यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना दिल्या.
मनसेच्या गट अध्यक्षांनी निवडणुकीसाठी विशेष जबाबदारी घ्यावी, मनसेच्या सगळ्या पदाधिका-यांनी कामाला लागावं, मनसैनिकांनी मतदारयाद्या तपासणीचं काम हाती घ्यावं, तयार मतदारयाद्या पुन्हा पुन्हा तपासा, मतदार याद्यांमध्ये कोणताही घोटाळा होऊ देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतल्या मतदारयाद्यांमध्ये सुरुवातीपासूनच घोळ असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मतदार याद्यांमधील घोळाबाबत पहिल्यांदा आपणच आवाज उठवल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय.राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार काम करणार असल्याचा निर्धार मनसेनं केलाय. मतदार याद्यांमध्ये कोणताही घोळ होऊ देणार नाही असंही मनसैनिकांनी सांगितलंय.
राज ठाकरेंनी मतदार याद्यांबाबत घेतलेल्या संशयावर राष्ट्रवादीनं टीका केलीय. मतदार यादी प्रत्येकवेळी अपडेट होत असते त्यात कोणताही घोळ नसल्याचा दावा सुनील तटकरेंनी केलाय. राज ठाकरेंना संशय वाटत असेल तर त्यांनी याद्या घेऊन तपासाव्या असं आवाहनही तटकरेंनी केलंय.
राज ठाकरे ईव्हीएमच्या आरोपावर काही बोलले नाहीत. पण बोगस मतदार आणि मतदार यादीत बाहेरची घुसडलेली नावं यावर त्यांची भूमिका स्पष्ट आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी किमान निर्दोष मतदार यादीआधारे मतदान व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे.
FAQ
प्रश्न: राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कोणत्या सूचना दिल्या?
उत्तर: राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी प्रत्येक मतदार यादी काळजीपूर्वक तपासण्याचे, मतदार यादीत घोळ होऊ न देण्याचे आणि पक्षसंघटनेने तातडीने निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश दिले. गटाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या देऊन मतदार यादी तपासणीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले.
प्रश्न: राज ठाकरे यांनी मतदार यादीबाबत कोणता आरोप केला आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय होती?
उत्तर: राज ठाकरे यांनी मुंबईतील मतदार यादीत सुरुवातीपासूनच घोळ असल्याचा आरोप केला आणि याबाबत प्रथम मनसेच आवाज उठवल्याचे सांगितले. त्यांनी बोगस मतदार आणि बाहेरील नावांचा समावेश टाळण्यासाठी यादी तपासणीवर जोर दिला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी टीका करताना मतदार यादी नियमितपणे अपडेट होत असून त्यात कोणताही घोळ नसल्याचा दावा केला. तटकरे यांनी राज ठाकरेंना संशय असल्यास यादी तपासण्याचे आवाहन केले.
प्रश्न: राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत काय भूमिका घेतली आणि त्यांची प्राथमिकता काय आहे?
उत्तर: राज ठाकरे यांनी ईव्हीएमबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य केले नाही, परंतु मतदार यादीतील बोगस मतदार आणि बाहेरील नावांच्या घुसखोरीबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांचे मुख्य लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निर्दोष आणि पारदर्शक मतदार यादी तयार करण्यावर आहे, जेणेकरून विधानसभा निवडणुकीतील कथित मतचोरीची पुनरावृत्ती टाळता येईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.