digital products downloads

Breaking News:पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधीची टीडीआरची खैरात, भाजपच्या बड्या मंत्र्यांमुळं कार्यकर्त्याचं उखळ पांढरं?

Breaking News:पिंपरी-चिंचवडमध्ये कोट्यवधीची टीडीआरची खैरात, भाजपच्या बड्या मंत्र्यांमुळं कार्यकर्त्याचं उखळ पांढरं?

Pimpri-Chinchwad TDR: गुंतवलेल्या पैशांचा चांगला परतावा मिळावा यासाठी ते रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जातात.काही लोकं तो पैसा बँकेत फिक्स डिपॉझिट करतात.. असेच बँकेत किंवा जमीन खरेदीत 58 कोटी गुंतवले कर त्याचे 213 कोटी रुपये होण्यास किती दिवस लागतील? रिअल इस्टेटमध्ये 10 वर्ष तर बँकेत कदाचित 17 ते 18 वर्ष लागतील. पण महाराष्ट्रात टीडीआरचे जादूचे प्रयोग झालेत. या प्रयोगातून एका कंपनीचं उखळ पांढरं झालंय. यात महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचा आग्रह कसा कामी आला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या च-होली गावातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या जमिनीबाबत हे प्रकरण आहे. या जमिनीचा टीडीआर मालकांना देताना सरकारी (महसूल विभागाची ) मेहेरबानी झाल्याचं समोर आलंय. थोडक्यात हे प्रकरण समजून घेऊयात…

Add Zee News as a Preferred Source

2007 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यात  चऱ्होलीतील एका जागेवर आरक्षण टाकण्यात आलं होतं. त्या जागेचे मालक होते हनुमंत गायकवाड. गायकवाड यांनी त्यांच्या या सुपीक जागे जागेऐवजी त्यांच्याच दुसऱ्या जागेवर हे आरक्षण टाकावं असा प्रसतव महापालिकेला दिला. हि दुसरी जागा होती सर्व्हे नंबर ३३ मधील १६ एकर. गायकवाड यांच्या प्रस्तावानंतर  पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हनुमंत गायकवाड यांच्या कंपनीत करार झाला. हा करार झाला २००८ मध्ये. या करारानुसार 2008च्या बाजारभावानुसार टीडीआर देण्याचं ठरलं..पैसा स्वरुपात मोबदला न घेता टीडीआर स्वरुपात मोबदला घेण्याचं त्यावेळी जमीन मालकानं कबुल केलं होतं.. पण कुठं माशी शिंकली माहिती नाही. टीडीआर हस्तांतरण लांबत गेलं . या गोष्टीला तब्बल 16 वर्ष उलटली… 202५ साल उजाडलं. हनुमंत गायकवाड यांनी टीडीआर मिळवण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरु केला. पण यावेळी पाठपुरावा करताना त्यांनी महापालिका आणि सरकारला थेट धमकावण्याची भाषाच सुरु केली. हनुमंत गायकवाड यांनी जमिनीचा मोबदला द्या अन्यथा मलनिस्सारण केंद्र बंद पाडू असा लेखी इशाराच सरकारला दिला.  

वास्तविक पाहता महापालिका जेव्हा एखाद्या आरक्षित जमिनीवर शाळा, बागा उभारते तेव्हा मालकांना त्याचा टीडीआर स्वरुपात मोबदला दिला जातो. तो मोबदला आधी मिळण्याऐवजी नंतरच मिळतो… पण एखाद्या जमीन मालकानं जमिनीवर महापालिकेनं उभारलेली शाळा बंद पाडण्याचा इशारा दिल्याचं ऐकिवात नाही… इथं मात्र हनुमंत गायकवाड यांनी महसूलमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात ही बाब स्पष्टपणे नमुद केलीय.

साई रियालिटीचा टीडीआर साठीचा  पाठपुरावा सुरु होण्याआधीच  अचानक जून  2024मध्ये संबंधित जमीन विकण्याचा निर्णय घेतला जातो… हनुमंत गायकवाड यांच्याकडून हि जमीन विकत घेण्यासाठी कॅलकॉन कंपनीनं करार केला. कॅलकॉन कंपनीनं हनुमंत गायकवाड यांच्या कंपनीकडून संबंधित जमीन 7 जानेवारी 2025 रोजी  58 कोटींना विकत घेतली… कॅलकॉन कंपनी निलेश तानाजी कलाटे यांच्या मालकीची आहे. भाजप नगरसेवक राहुल कलाटे  हे निलेश कलाटे यांचे सख्खे भाऊ आहेत आणि त्याचबरोबर कॅलकोन मधील दुसरे भागीदार देखील आहेत.  निलेश तानाजी कलाटे यांनी जमीन विकत घेतल्यानंतर जमिनीचं टीडीआर प्रकरण अचानक वेग पकडू लागतं

जमिनीबाबत पडद्याआडून काहीतरी मोठ्या घडामोडी घडल्या की काय?. जानेवारीत ज्या जमिनीचा सरकारी  बाजारभाव 336 रुपये प्रतिस्क्वेअर फूट होता तो भाव एप्रिलमध्ये अचानक वाढवण्यात आला.सरकारनं एप्रिलमध्ये जेव्हा रेडीरेकनरमध्ये बदल करण्यात आला तेव्हा तो भाव होता तब्बल 673 रुपये प्रतिक्वेअरफूट म्हणजे रेडीरेकनरचे दर तब्बल 100 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात वाढवण्यात आले. 

जमिनीचा व्यवहार ज्या कॅलकॉन कंपनीशी झाला ही कंपनी निलेश तानाजी कलाटे यांची आहे. निलेश तानाजी कलाटे कोण आहेत याचा आम्ही शोध घेतला तर हे निलेश कलाटे पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक भाजप नेते राहुल कलाटे यांचे सख्खे भाऊ आहेत. राहुल कलाटे यांचा या प्रकरणाशी थेट संभंध आहे .  तो कसा आहे ते पुढं कळेल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp