digital products downloads

Central Railway Special Train : मुंबईतून धावणार 24 विशेष गाड्या, 4 जिल्ह्यांतील रेल्वे प्रवशांना होणार फायदा

Central Railway Special Train : मुंबईतून धावणार 24 विशेष गाड्या, 4 जिल्ह्यांतील रेल्वे प्रवशांना होणार फायदा

Special Train : प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.  प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे मुंबई आणि नागपूर / कोल्हापूर / सावंतवाडी रोड तसेच पुणे आणि नागपूर दरम्यान 24 विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी 2026 मध्ये प्रवाशांची वाढती गर्दी आणि महाशिवरात्रीनिमित्त (15 फेब्रुवारी) मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान 24 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नागपूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुख्य मार्ग आणि गाड्यांची संख्या

मुंबई (CSMT) – कोल्हापूर (6 फेऱ्या): या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, पुणे, सातारा आणि सांगली मार्गे धावतील.
मुंबई (CSMT) – सावंतवाडी रोड (6 फेऱ्या): कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी या विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
मुंबई (CSMT) – नागपूर (2 सुपरफास्ट फेऱ्या): नागपूर आणि मुंबई दरम्यानच्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी.
मुंबई (LTT) – नागपूर (4 फेऱ्या): लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या गाड्या सुटतील.
पुणे – नागपूर (6 सुपरफास्ट फेऱ्या): पुणे आणि नागपूर या दोन मोठ्या शहरांना जोडण्यासाठी या गाड्या चालवल्या जातील. 

कुठे थांबणार रेल्वे 

या विशेष गाड्यांमुळे खालील मुख्य जिल्ह्यांतील प्रवाशांना फायदा होईल: 
कोल्हापूर व सांगली: कोल्हापूर-मुंबई विशेष गाडीमुळे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी: सावंतवाडी रोड आणि कोकण रेल्वे स्थानकांमुळे.
नागपूर: विदर्भातील प्रवाशांसाठी मुंबई आणि पुण्यावरून थेट गाड्या उपलब्ध होतील.
इतर थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, सातारा, मिरज इ.. 

आरक्षण आणि सुविधा

आरक्षण: या गाड्यांचे बुकिंग 10 फेब्रुवारी 2026 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
डब्यांचे स्वरूप: या गाड्यांमध्ये एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल डब्यांचा समावेश असेल. 

ट्रेनबद्दल सविस्तर माहिती 

सीएसएमटी-कोल्हापूर

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (६ सेवा) 
ट्रेन क्रमांक 01029 विशेष १३.०२.२०२६, १८.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01030 विशेष १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दुपारी १५.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.

 थांबे : दादर, ठाणे (फक्त 01030 साठी), कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज.

डब्यांची रचना: ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

सीएसएमटी – सावंतवाडी 

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष- (६ सेवा) 
ट्रेन क्रमांक 01129 विशेष दि. १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.३० वाजता पोहोचेल. 
ट्रेन क्रमांक 01130 विशेष १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून १७.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.

 थांबे : दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

डब्यांची रचना:: १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य आणि २ द्वितीय सामान्य श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

सीएसएमटी – नागपूर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट विशेष- (२ सेवा)*
ट्रेन क्रमांक 02139 सुपरफास्ट विशेष १९.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. 
ट्रेन क्रमांक 02140 सुपरफास्ट विशेष १७.०२.२०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल.

 थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

डब्यांची व्यवस्था : १ वातानुकूलित द्वितीय, ५ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

सीएसएमटी – नागपूर 

 लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष – (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01021 सुपरफास्ट विशेष १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. 
ट्रेन क्रमांक 01022 विशेष दि. १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. 

 थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

डब्याची व्यवस्था : १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन.

 पुणे – नागपूर – पुणे सुपरफास्ट विशेष 

ट्रेन क्रमांक 01467 सुपरफास्ट विशेष १३.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. 
ट्रेन क्रमांक 01468 सुपरफास्ट विशेष दि. १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.

डब्याची व्यवस्था : २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

 पुणे – नागपूर – पुणे सुपरफास्ट विशेष

ट्रेन क्रमांक 01419 सुपरफास्ट विशेष १८.०२.२०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल. 
ट्रेन क्रमांक 01420 सुपरफास्ट विशेष १९.०२.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३.३० वाजता पोहोचेल.

 संरचना : १ प्रथम वातानुकूलित, १ वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय  आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.

 01467/01468  आणि 01419/01420 साठी थांबे :- उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp